SpreadIt News | Digital Newspaper

💰 जुनी गाडी वापरताय..? मग तुम्हालाही भरावा लागणार ‘ग्रीन टॅक्स’, वाचा सविस्तर..

0

🚙 8 वर्षे जुन्या वाहनांवर लवकरच ग्रीन टॅक्स (हरित कर) आकारला जाण्याची शक्यता आहे. मंत्री नितीन गडकरी यांच्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ग्रीन टॅक्स आकारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

✔️ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी ग्रीन टॅक्स आकारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून हा प्रस्ताव आता सल्लामसलतीसाठी राज्यांकडे पाठविण्यात येणार आहे.

Advertisement

💁🏻‍♂️ ग्रीन टॅक्स ‘असा’ आकारला जाणार –

▪️ पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार प्रदूषण करणाऱ्या जुन्या वाहनांवर हरित कर लावण्याचा विचार करत आहे.

Advertisement

▪️ प्रस्तावानुसार, जी वाहने 8 वर्षांपेक्षा जुनी आहेत त्यांच्याकडून वाहनयोग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण करताना रस्ता कराच्या 10 ते 25 टक्के दराने हरित कर आकारण्यात येण्याची शक्यता आहे.

▪️ खासगी वाहनांकडून नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करताना 15 वर्षांनंतर हरित कर आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक परिवहन सेवेतील (शहर बसगाडय़ा) गाडय़ांकडून हा कर कमी प्रमाणात आकारला जाईल.

Advertisement

🤷‍♂️ कोणत्या वाहनांना मिळणार सूट ?

🔌 हायब्रिड, इलेक्ट्रिक आणि सीएनजी, इथेनॉल आणि एलपीजीवर चालणाऱ्या गाड्यांना या करातून सूट देण्यात येईल.

Advertisement

🔌 हरित कराद्वारे जमा होणाऱ्या महसुलाचा वापर वाढत्या प्रदूषणाचा प्रश्न हाताळण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी केला जाणार आहे, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सोमवारी सांगितले.

😳 15 वर्षांपेक्षा जुन्या सर्व सरकारी वाहनांची नोंदणी 1 एप्रिल 2022 पासून रद्द : पर्यावरण संरक्षणासंदर्भात मंत्रालयाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत 15 वर्षांपेक्षा जुन्या सर्व सरकारी वाहनांची नोंदणी 1 एप्रिल 2022 पासून रद्द करण्यात येणार आहे आणि त्यांना भंगारात काढले जाईल. याची अधिसूचना लवकरच जारी करण्यात येईल.

Advertisement