SpreadIt News | Digital Newspaper

💁🏻‍♀️ पत्नी-मुलांविषयी माहिती लपवलेल्या इतरांची नावे घेऊ का? अजित दादा मुंडे प्रकरणावरून भडकले!

0

🧐 रेणू शर्मा नामक युवतीने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप लावले. तिच्या मोठ्या बहिणी सोबत परस्पर सहमतीने असणारे संबंध धनंजय मुंडे यांनी स्वीकारले आहेत.

👉🏻 त्या दोघांना झालेल्या मुलांची जबाबदारी देखील धनंजय मुंडे यांनी घेतली असल्याचे जगजाहीर केले आहे. या सगळ्या प्रकारानंतर महाराष्ट्रातील राजकारणाने वेगळे रूप घेतले आहे.

Advertisement

➡️ या एका गोष्टीवरून विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. निवडणूक आयोगाकडे भाजपच्या बड्या नेत्यांनी तक्रार देखील केली आहे.

◼️ सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीनंतर अजित पवार पुण्यात पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यानंतर झालेल्या एका बैठकीत प्रसारमाध्यमांनी धनंजय मुंडेंवर लागणाऱ्या आरोपांविषयीची तथ्यता, आणि विरोधकांनी माहिती लपवल्याचा केलेला आरोप, याविषयी बोलण्यास अजित पवारांना सांगितले.

Advertisement

📌 अजित दादांनी “फक्त धनंजय मुंडेच नाही तर इतरही अनेक जणांनी पत्नीचे नाव लपवले. मुलांची नावे लपवली किंवा लग्नच केलेले नाही असे अनेक प्रकार मला माहित आहेत. मी ही त्यांची नावे घेऊ का?” असा प्रश्न विचारत प्रसारमाध्यमांना गप्प केले आणि विरोधकांना त्यांच्या शैलीत उत्तर दिले!

Advertisement