SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎬 मुंबई पोलिसांची ‘या’ चॅनेलवर मोठी कारवाई; कॉपीराईटविना दाखवले अमिताभ बच्चन यांचे चित्रपट

🎥 अभिनेते अमिताभ बच्चन यांचे काही चित्रपट कॉपीराईटशिवाय दाखवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका चॅनलवर मोठी कारवाई केली आहे.

👮🏻 ‘अशी’ केली कारवाई..

Advertisement

▪️ मुंबईच्या गुन्हे शाखेने ‘महामुव्ही’ नामक चॅनेलवर कारवाई केली असून, या कारवाईत महामुव्ही चॅनेलचा सर्व्हर व कंटेंट सील केले आहे. यापूर्वी मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच महामुव्हीजच्या सीईओंना अटक केली होती.

▪️ मागील काही दिवसांपासून टीआरपी घोटाळ्याप्रकरणी क्राइम ब्रँचने 3600 पानांचे पुरवणी दोषारोपपत्र दंडाधिकारी न्यायालयात सादर केले होते.

Advertisement

▪️ रिपब्लिक टीव्हीचे अधिकारी विकास खानचंदानी आणि बार्कचे माजी अधिकारी रोमिल रामगडीया, माजी कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्या विरोधात हे दोषारोपपत्र दाखल केले गेले.

▪️ रिपब्लिक टीव्हीच्या अधिकारी प्रिया मुखर्जी, शिवेंदू मुळेलकर, रॉबर्ट वॉल्टर आणि शिव सुंदरम् हे फरार आरोपी असल्याचे दोषारोपपत्रात नमूद आहे.

Advertisement

▪️ काही चॅनल्स जाहिरातींद्वारे महसूल मिळविण्यासाठी टीआरपी वाढवून दाखवतात. त्याबाबत तक्रार बीएआरसी म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलिंग (बार्क)ने पोलीस ठाण्यात केली होती. या घोटाळ्यात रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा सहभागी असल्याचे नोव्हेंबर महिन्यात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.

©️ कॉपीराईट म्हणजे काय..?

Advertisement

📌 1914 साली ‘इंडियन कॉपीराइट अ‍ॅक्ट’ कायदा आला व त्यानंतर 1957 मध्ये ‘द कॉपीराइट अ‍ॅक्ट 1957’ असे त्याचे नामकरण करण्यात आले.

📌 ‘द कॉपीराइट अ‍ॅक्ट 1957’ मध्ये तेव्हापासून तर 1994 पर्यंत अनेक सुधारणा केल्या आहेत. कोणतीही स्वतंत्र निर्मिती – म्हणजे कलाकृती, रंगमंचीय आविष्कार, संगीत इ. तयार केल्यावर त्याचा स्वामित्व हक्क(कॉपीराईट) त्याच्या कर्त्यांला मिळतो.

Advertisement

📌 मूळ कृतीत बदल करणे, त्यात काटछाट करणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे त्या कृतीला बाधा येत असेल वा त्यायोगे कर्त्यांच्या प्रतिष्ठेला वा कीर्तीला धक्का बसत असेल तर अशा प्रती प्रकाशित करण्यास आणि त्याचे वितरण करण्यास कर्ता कायद्याने रोखू शकतो किंवा संबंधितांकडे नुकसान भरपाईही मागू शकतो.

Advertisement