Take a fresh look at your lifestyle.

🇮🇳 जाणून घ्या; कशी आहे तिरंगा बनवण्याची प्रक्रिया आणि अधिकृत तिरंग्याची वैशिष्ट्ये!

0

😎 प्रत्येक देशासाठी त्याची अभिमान स्थाने ठरलेली असतात. जगाच्या पातळीवर प्रत्येक देशाचे नेतृत्व त्याचा झेंडा करत असतो. त्यामुळे झेंड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच झेंड्याविषयी काही रंजक माहिती जाणून घेऊयात:

➡️ भारतीय झेंडा फक्त एकाच कंपनीकडून बनवण्यात येतो. भारतासाठी कर्नाटकातल्या हुबळी युनिट कडून आपला तिरंगा बनवण्यात येतो. कर्नाटक खादी ग्राम उद्योगकडून ही झेंडा बनवण्याची कामगिरी केली जाते.

Advertisement

🧐 तिरंगा अनेक टप्प्यांनंतर तयार होतो. ज्यात धागा तयार करणं, कपडा तयार करणं, ब्लीचिंग व डाइंग चक्राची छपाई, तीन पट्ट्यांची शिलाई, इस्त्री करणं आणि टॉगलिंग यांचा समावेश आहे.

ℹ️ राष्ट्रीय ध्वजाची क्वालिटी BIS चेक करतात. प्रत्येक सेक्शनमध्ये एकूण 18 वेळा तिरंग्याची क्वालिटी चेक केली जाते.

Advertisement

🤔 कोणकोणता तिरंगा अधिकृत?

◼️ सरकारी मीटिंग्स आणि कॉन्फरन्स इत्यादी टेबलवर ठेवला जाणाऱ्या झेंड्याला अधिकारिक महत्व प्राप्त आहे.

Advertisement

◼️ संवैधानिक पदांवर असलेल्या व्हीव्हीआयपी कार्ससाठी.

◼️ संसद आणि मंत्रालयांच्या रूम्समध्ये क्रॉस बारवर दिसणारे झेंडे अधिकारिक असतात.

Advertisement

◼️ सरकारी कार्यालये आणि छोट्या इमारतींवर लावल्या जाणाऱ्या झेंड्यांना अधिकारिक दर्जा प्राप्त आहे.

◼️ इतकेच नाही तर शहीद सैनिकांच्या पार्थिवावर ठेवण्यासाठीही अधिकारिक ध्वजाचा वापर केला जातो.

Advertisement

◼️ परेड करणाऱ्या सैनिकांच्या गन कॅरिएजवर लावलेला झेंडाही अधिकारिक असतो.

◼️ लाल किल्ला, इंडिया गेट, राष्ट्रीय संग्रहालये, संसद भवन, राष्ट्रपती भवन यांवर लागणारे झेंडेही अधिकारिक आहेत.

Advertisement

Leave a Reply