SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🤔 5, 10, 100 रुपयांच्या जुन्या नोटा बंद होत असल्याची चर्चा; पण सरकारने दिलं ‘असं’ स्पष्टीकरण..

💸 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय मार्च किंवा एप्रिलपर्यंत 5, 10, 100 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करत असल्याची जोरदार चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे.

📱 सोशल मीडियामध्येही अशा बातम्यांचे अनेक स्क्रीनशॉट, मेसेज व्हायरल झालेत. व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्यांबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी अखेर याची दखल घेत सरकारच्या पत्रसूचना विभागाने (पीआयबी) याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

Advertisement

❓ नेमकं खरं काय ?

📌 “आरबीआयकडून मार्च 2021 पासून 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात येणार आहेत, असा दावा एका वृत्तामध्ये केला जातोय. मात्र या वृत्तात कोणतंही तथ्य नाहीये” असं पीआयबीकडून सांगण्यात आलंय.

Advertisement

📌 याशिवाय, “आरबीआयकडून अशाप्रकारची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही” असंही पीआयबीने स्पष्ट केलंय. ट्विटरद्वारे ‘पीआयबी फॅक्ट चेक’ने ही माहिती दिली.

📌 पीआयबी फॅक्ट चेक केंद्र सरकारच्या पॉलिसी / योजना / विभाग / मंत्रालयांविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कार्य करते. सरकारशी संबंधित कोणतीही बातमी सत्य किंवा असत्य आहे हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते.

Advertisement