Take a fresh look at your lifestyle.

🐅 फिरण्यासाठी नवं ठिकाणं! पाचशे रुपयात व्याघ्र सफारी

0

चंद्रपूर : नेहमीच्या व्यापातून वेळ काढून भटकंती करण्याची प्रत्येकाच्याच मनात अधूनमधून घरं करत असते. भटकंती वेड असणाऱ्यासाठी कमी पैशात व्याघ्र सफारी घडवून आणणारा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

मध्य चांदा वन विभागांतर्गत बल्लारपूर वन परिक्षेत्रातील कारवा संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून कारवाच्या जंगलात गणतंत्र दिन २६ जानेवारी पासून व्याघ्र सफारीला सुरूवात होत आहे. प्रादेशिक वनक्षेत्रात अवघ्या ५०० रूपयात व्याघ्र सफारीचा हा देशातील पहिला उपक्रम आहे.

Advertisement

स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी लोकसहभागातून सदर पर्यटन राबविण्यात येत आहे. या सफारीसाठी ३० कि.मी चा कच्चा रस्ता आहे. या व्याघ्र सफारीत पर्यटकांना ७ वाघ, बिबट, रानगवे, अस्वल, रानमांजर, हरीण, चितळ, सांबंर निलगाय, चौसिंगा, सायाळ, रानकुत्रे, मुंगुस यासह २०० प्रकारचे पक्षी पर्यटकांना अनुभवता येणार आहे.

🐯 एकूण २४ व्याघ्र सफारी मार्ग : 

Advertisement

या जिल्ह्यात व्याघ्र सफारीसाठी एकूण २४ मार्ग आहेत. त्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कोर झोनमध्ये ६, बफर झोनमध्ये १४ व प्रादेशिक वन विभागात ४ रस्ते राहणार आहेत. एका जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात व्याघ्र सफारीसाठी रस्ते असलेला चंद्रपूर हा एकमेव जिल्हा आहे.

Advertisement

Leave a Reply