SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

😨 ‘प्रेम-प्रकरण घरी समजेल’, म्हणून ‘तिने’ केली मैत्रिणीचीच हत्या, पोलिसांनी हत्येचं गूढ ‘असं’ उलगडलं..

🤨 दिल्लीपासून 60 किमी लांब असलेल्या ‘पलवल’ या ठिकाणी धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या प्रेम-संबंधाची माहिती घरी कळेल, या भितीपोटी एका तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने मैत्रिणीचीच हत्या केल्याचं उघड झालं आहे.

🧐 प्रकरण ‘असं’ आहे..

Advertisement

▪️ या हत्येमधील या तरुणीचं नाव ज्योती असून तिने आपला प्रियकर पवनच्या साथीने तिची मैत्रीण ऋतुची हत्या केल्याचं समजतंय. ऋतु ही BSC पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत होती.

▪️ या हत्येमुळे नजीकच्या परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी तरुणीला ताब्यात घेतलं असून केली तिचा प्रियकर अद्याप फरार आहे. पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत.

Advertisement

😓 भितीपोटी हत्या…पण ही भीती कसली..?

📌 मयत ऋतुला आरोपी ज्योती आणि तिचा प्रियकर पवन यांच्या प्रेमसंबंधाबद्दल माहिती झालं होतं. मृत ऋतु आपल्या प्रेम संबंधाची वाच्यता घरच्यांपुढे करेल, या भितीपोटी ज्योतीने ऋतुच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी तिने गुरुवारी सकाळी नऊ वाजता कॉलेजला जाण्यासाठी ऋतुच्या घरी गेली होती.

Advertisement

📌 त्यानंतर ज्योतीने पवनच्या मदतीने ऋतुची गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह आग्रा कॅनलच्या एका झाडीत टाकून दिला.

👤 हत्या करून झाले फरार..

Advertisement

👮🏻 या घटनेनंतर पवन व ज्योती हे दोन्ही आरोपी तिथून फरार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हत्या झालेल्या ठिकाणी धाव घेवून मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला.

👮🏻 तसे पोलिसांनी ज्योती व पवनविरोधात हत्या आणि इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी आरोपी ज्योतीला अटक केली आहे. तिचा प्रियकर अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Advertisement

📍 मयत ऋतुचे वडील रमेश चंद यांनी या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत त्यांनी सांगितलं की, त्यांची मोठी मुलगी ऋतु BSC च्या अंतिम वर्षात शिकत होती. गुरुवारी सकाळी ठीक 9 वाजता ती मैत्रीण ज्योतीसोबत घरून कॉलेजला गेली होती. याच मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी घटनेचा तपास केला आणि हत्येचं गुढ उलगडलं आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🤝 स्प्रेडइटला नक्की फॉलो करा
▪️इंस्टाग्राम 👉 instagram.com/spreadit_india
▪️फेसबुक 👉 fb.com/spreaditindia
▪️व्हॉट्सअ‍ॅप 👉 spreadit.in

Advertisement