SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

📱 LG K42 स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल खुश!

📳 LG K42 ला भारतात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आणि 4000 एमएएच क्षमतेच्या बॅटरी सोबत लाँच केले आहे.

🔎 तसेच नवीन एलजी फोन मिलिट्री-ग्रेड MIL-STD-810G सर्टिफाइड बिल्ड सोबत येतो. या फोनमध्ये 9 वेगवेगळ्या कॅटेगरीत यूएस मिलिट्री टेस्टिंग पास केली आहे. यात हाय लो टेम्परेचर, शॉक, व्हायब्रेशन, टेम्परेचर शॉक आणि ह्यूमिडिटी याचा समावेश आहे.

Advertisement

😍 LG K42 चे खास फिचर्स –

💰 किंमत आणि कलर्स- LG K42 ची किंमत भारतात 3 जीबी प्लस 64 जीबी व्हेरियंटसाठी 10 हजार 990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन ग्रे आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये येणार आहे. या फोनमध्ये ड्यूल सिम (नॅनो) सपोर्ट मिळणार आहे.

Advertisement

⚧ रॅम,मेमरी, प्रोसेसर- या फोनमध्ये 6.6 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅमसोबत ऑक्टा कोअर मीडियाटेक हेलिओ पी 22 प्रोसेसर दिला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड 10 बेस्ड एलजी यूएक्सवर काम करतो.

🤳 कॅमेरा- फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये रियरमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात फ्रंटला 8 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

Advertisement

🛒 या फोनमध्ये आणखी काही जबरदस्त फंक्शन दिले आहेत. ग्राहकांना हा मोबाईल एक्सक्लूसिव्ह म्हणून फ्लिपकार्टवरून खरेदी करता येऊ शकते. तसेच ग्राहकांना या फोनसोबत दोन वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी आणि 1 वर्षासाठी फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट मिळणार आहे.

Advertisement