SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

👶🏻 तुमच्या लाडक्या बाळाला जेवण भरवताना हातात मोबाईल देताय..? मग वाचा ‘या’ होणाऱ्या नुकसानाबद्दल..

📱 आजकाल मोबाईल म्हणजे कोणत्याही वयात असणाऱ्या व्यक्तींसाठी एक प्रकारचे खेळणे झाले आहे. मोबाईल हा सगळ्या गोष्टींसाठी उपाय म्हणून वापरला जातो. मोबाईलमुळे अनेकदा आपली कामे सहज होतात.

😣 आत्ताच्या वेळेला मोबाईल वापरणे फार गरजेचे झाले आहे. मोबाईलच्या वापराने लहान मुलांनाही त्रास होऊ शकतो; पण कोरोनानंतरच्या काळात अगदी मुलांचे शिक्षण हे डिजिटल स्वरूपात म्हणजेच मोबाईलच्या माध्यमातून होत आहे.

Advertisement

👍 मोबाईल हे सध्याच्या काळातील महत्वाचे साधन बनले आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे जण मोबाईल वापरतात. त्यामुळे मोबाइल हे दैन्यंदिन आयुष्यातला एक महत्वाचा भाग बनला आहे.

👨‍👩‍👦 पहिल्या काळात कुटुंब पद्धती एकत्र होती. त्यामुळे मुलांना सांभाळण्यासाठी घरातील खूप माणसं होती, पण आजकाल कुटुंबपद्धती हि विभक्त प्रकारची जास्त असल्याने जबाबदारीचे काम कसलेही असो, हे फक्त लहान मुलांच्या आईवडीलांवर येते. त्यामुळे आईची सगळ्यात जास्त चिडचिड होते. कारण आई घरातील जास्तीत जास्त काम करत असते.

Advertisement

🧐 मग, मोबाईलने होतो लहान मुलांवर ‘असा’ परिणाम..

👉 कधी कधी मुलं जेवत नसल्यास आई स्वतः मुलांना मोबाईल देतात. आणि मग मुलांना जेवण भरवतात; पण हि जी पद्धत आहे ती अत्यंत चुकीचं पद्धत आहे.

Advertisement

👉 मुलांना जेवण देताना या पद्धतीचा वापर करू नये. कारण मुलांचे डोळे हे अत्यंत नाजूक स्वरूपाचे डोळे असतात आणि त्या नाजूक डोळ्यांवर स्कीन चा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.

👉 त्यामुळे मुलांच्या बाबतीत कोणतीही गोष्ट करताना किंवा त्यांना सवय लावताना आई वडिलांनी 10 वेळा विचार करणे गरजेचे आहे.

Advertisement

👉 लहान मुलांच्या बाबतीत एक गोष्ट होत असते की, खूपदा आई-वडील आपल्या मुलांसाठी वेळ काढू शकत नाहीत. पालकांना बहुतेक वेळा आपल्या मुलांसाठी वेळ नसतो. मुलांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून करमणुकीचे साधन हे हवे असते.

👉 त्यासाठी मग मुलं आई वडिलांकडे कार्टून पाहण्यासाठी, लहान मुलांची गाणी वगैरे पाहण्यासाठी वा गेम्स खेळण्यासाठी मोबाईलचा हट्ट करतात. म्हणून याचा परिणाम असा होतो की, अनेक वेळा आपण आपल्या आजूबाजूला फक्त आई वडील आणि एकुलता एक बाळ हे असेच कुटुंब पाहायला मिळते.

Advertisement