Take a fresh look at your lifestyle.

✊ घडामोडी: कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं ‘लाल वादळ’ मुंबईत धडकलं; आता पुढं काय..?

0

🧐 अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चाचं वादळ अखेर काल रात्री मुंबईत पोहोचलं आहे. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. आज 25 जानेवारीला दुपारी हा मोर्चा राजभवनावर मोर्चा धडकणार आहे.

💁🏻‍♂️ जाणून घेऊयात घडामोडी :

Advertisement

⭕ शेकडो किलोमीटर अंतर कापून मुंबईत दाखल झालेले शेतकरी आझाद मैदानात निवांत झोपी गेले. मैदानात तयार करण्यात आलेल्या मंडपात हजारो शेतकऱ्यांनी रात्री आराम केला.

⭕ आझाद मैदानात शेतकऱ्यांचे तीन दिवसांचे धरणे आंदोलन असणार आहे. हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले असून हे लाल वादळ नाशिक कसारा घाटामार्गे शहापूर तालुक्यातून मुंबईत दाखल झालं.

Advertisement

⭕ या आंदोलनाला राज्यातील विविध पक्ष आणि संघटनांनी समर्थन दिले आहे. आज या आंदोलनात अनेक मोठे नेतेही सहभाग घेणार आहेत.

⭕ या ठिकाणी भव्य व्यासपीठही तयार करण्यात आले आहे. त्याच्या समोरच या हजारो शेतकऱ्यांनी आपला तळ ठोकला आहे.

Advertisement

⭕ दिल्लीला सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी काल हजारोच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले.

⭕ या ठिकाणी आदिवासी विभागातून आलेल्या शेतकऱ्यांनी रात्री एकत्रित पारंपरिक वाद्यांच्या धूनवर ठेका धरला. तारपा नृत्य करत या शेतकऱ्यांनी आपला थकवा घालवला.

Advertisement

⭕ मुंबईत आझाद मैदानात मोर्चा दाखल झाल्यानंतर आज सकाळी 11 वाजता मुंबईतील आझाद मैदानात भाजप सोडून इतर सर्व पक्षातील नेते एकत्र येणार असल्याची शक्यता आहे.

⭕ सकाळी 11 वाजता केंद्र सरकारच्या या धोरणाला विरोध केल्यानंतर हा मोर्चा राजभवनाच्या दिशेनं कूच करणार आहे.

Advertisement

📍अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चाचं वादळ काल रात्री अखेर मुंबईत पोहोचलं आहे. या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इ. वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. आज, 25 जानेवारीला मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात 60 दिवसांपासून दिल्लींच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.

Advertisement

Leave a Reply