SpreadIt News | Digital Newspaper

😨 अभिनेता वरूण धवनचं आज लग्न, पण गाडीला झाला अपघात; आता ‘अशी’ आहे वरूणची परिस्थिती..

0

🎉 बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचे आज लग्न आहे. त्यातच धक्कादायक बाब अशी की, वरुण धवनच्या गाडीला आज अपघात झाला आहे. प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन आज ( 24 जानेवारी) त्याची प्रेयसी नताशा दलालसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

🧐 अपघात कसा घडला..?

Advertisement

▪️ प्रसिद्ध निर्माते डेव्हिड धवन यांचा मुलगा अभिनेता वरुण त्याच्या लग्नासाठी जुहूवरुन अलिबागकडे आपल्या कारने निघाला होता. मात्र, त्याचक्षणी वाटेत त्याच्या गाडीचा अपघात झाला आहे. सुदैवाने वरुण धवनला कोणतीही दुखापत झालेली नाही.

▪️ परंतु, लग्नाला जाण्यापूर्वीच हा अपघात झाल्यामुळे सर्वत्र चिंतेचं, काळजीचं वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. याविषयी अनेक ठिकाणी आता उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

Advertisement

▪️ लग्नाच्या तयारीसाठी वरुण आणि नताशाच्या कुटुंबातील सदस्य शुक्रवारीच अलिबागला पोहोचले होते. मात्र, काही कारणामुळे वरुणला जाणं शक्य झालं नाही.

▪️ त्यामुळे तो 23 तारखेला त्याच्या कारने अलिबागच्या दिशेने रवाना झाला होता. याचवेळी ट्रॅफिकमध्ये सापडलेल्या वरुणच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्याच्या गाडीचं किरकोळ नुकसान झालं आहे. मात्र, वरुणला कोणतीही दुखापत झालेली नाही.

Advertisement

👩🏻 कोण आहे नताशा दलाल..?

वरुण धवन आज सक्सेसफुल फॅशन डिझायनर व आपली लहानपणीची मैत्रिण नताशा दलाल सोबत लग्नगाठ बांधणार आहे. नताशा आणि वरुण धवन यांचं लग्न आज अलिबागच्या सासवने परिसरात ‘द मेन्शन हाऊस’मध्ये पार पडणार आहे. नताशा लग्नासाठी स्वतः डिझाईन केलेला घागरा परिधान करणार आहे.

Advertisement

📍 वरुण आणि नताशाच्या लग्नासाठी सुरक्षेची सर्व व्यवस्था तंतोतंत केली आहे, जेणेकरून गोपनीयतेत कोणत्याही प्रकारे कमीपणा राहू नये. लग्नस्थळाभोवती खूप मोठ्या संख्येने सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा लावण्यात आले आहेत.

Advertisement