SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 कसा असेल तुमचा आठवडा? वाचा साप्ताहिक राशिभविष्य..

◼️ मेष : योग्य वाटचाल राहील.

किचकट गोष्टींना आळा बसेल. परिस्थितीनुसार निर्णय घ्या. पैशांच्या बाबतीत समाधानकारक स्थिती निर्माण होईल. व्यवसायामध्ये मागणी तसा पुरवठा करण्याचे तंत्र सुरळीत चालू राहील. जोडीदाराशी वाद-विवादाचे प्रसंग टाळा. आरोग्य उत्तम राहील.

Advertisement

👌 शुभ दिनांक : 24, 30

◼️ वृषभ : आघाडी मिळवू शकाल.

Advertisement

ठरवलेल्या कार्यक्षेत्रात भरारी घेण्याचा निर्णय योग्य ठरेल. व्यवसायात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. उधारी वसूल होईल. नोकरीच्या समस्या निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्याल. राजकीय क्षेत्रात आघाडी मिळवू शकाल. घरगुती वातावरण आनंदाचे असेल. मानसिक स्थैर्य लाभेल.

👌 शुभ दिनांक : 26, 30

Advertisement

◼️ मिथुन : आशावादी दृष्टिकोन

सप्ताहाची सुरुवात आळसपणाने करू नका. जोमाने कामाला लागा. व्यवसायाची बाजू भक्कम होईल. मित्रांवर भरवसा ठेवून कोणताही व्यवहार करू नका. नोकरी बदलण्याचा निर्णय सध्या तरी करू नका. राजकीय क्षेत्रात कायद्याच्या गोष्टी हातात घेऊ नका. प्रकृतीची काळजी घ्या.

Advertisement

👌 शुभ दिनांक : 26, 28

◼️ कर्क : सकारात्मकतेने प्रगती

Advertisement

तुमच्या राशीतूनच पौर्णिमा होत आहे. सध्या गुंतवणूक करताना आवक पाहून जावक ठरवा. खर्चाचे आकडे चुकणार नाहीत याची दक्षता घ्या. व्यापार-उद्योगाच्या दृष्टीने सकारात्मक विचार प्रगतिकारक राहतील. नवे नातेसंबंध प्रस्थापित करताना आपली भूमिका महत्त्वाची ठरेल.

👌 शुभ दिनांक : 24, 28

Advertisement

◼️ सिंह : धावपळ कमी करा

न जमणाऱ्या गोष्टींसाठीचे धाडस टाळा. व्यापाऱ्यांनी गोड बोलून तडजोड करत राहा. विनाकारण होणारी धावपळ कमी करा. महत्त्वाचे कार्य साध्य करण्यासाठी वैचारिक पातळी बिघडू देऊ नका. जुन्या मैत्रीची भेट होईल. वैवाहिक जोडीदाराशी जुळणारे सूर आनंददायी ठरतील.

Advertisement

👌 शुभ दिनांक : 26, 30

◼️ कन्या : पोषक वातावरण

Advertisement

सप्ताह अनेक क्षेत्रांत अनुकूलतेकडे झेपावणारा आहे. आवडीच्या क्षेत्रात आघाडी घेता येईल. असणारी परिस्थिती, येणारे संकेत यांचा चांगला मेळ जमून येईल. कामाची पावती मिळेल. कौटुंबिक नात्यातील वातावरण पोषक राहील. आरोग्य उत्तम असेल.

👌 शुभ दिनांक : 24, 28

Advertisement

◼️ तूळ : सक्षमता वाढेल

कामाच्या ठिकाणी संघर्ष वाढणार नाही याकडे लक्ष द्या. व्यापार-उद्योगात सरळ मार्ग सोडू नका. नोकरदारांना एकाच कामात न गुंतता इतर कामातसुद्धा लक्ष घालावे लागेल. सामाजिक क्षेत्रात द्विधा अवस्था कमी करा. नातेवाईकांशी गोडीचा संवाद साधाल. शारीरिक त्रास कमी होईल.

Advertisement

👌 शुभ दिनांक : 26, 30

◼️ वृश्चिक : सतत कार्यरत राहा.

Advertisement

आवश्यक गोष्टींचा पाठपुरावा वाढवण्याची गरज भासणार नाही. मोठ्या उद्योगधंद्यांना नवी दिशा मिळेल. लांबणीवर असलेली कामे आता पूर्वपदावर येतील. नातेवाईकांशी होणाऱ्या संपर्कातून नवीन बदल घडेल. वैवाहिक जोडीदाराशी प्रामाणिक राहा. शारीरिकदृष्ट्या समतोल राखण्याचा प्रयत्न करा.

👌 शुभ दिनांक : 28, 29

Advertisement

◼️ धनू : समयसूचकता बाळगा.

अनावश्यक गुंतवणूक टाळा. परिस्थितीशी मिळते-जुळते घेऊन राहावे लागेल. फायदा-तोट्याचा हिशोब आधीच केला तर बरेच नुकसान टळेल. कामामध्ये समयसूचकता बाळगा. कुटुंबाशी मिळूनमिसळून राहा. प्रकृती स्वास्थ्य जपा.

Advertisement

👌 शुभ दिनांक : 27, 30

◼️ मकर : बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

Advertisement

जास्तीचे एक पाऊल मागे घेणे हिताचे ठरेल. उधार-उसनवारीचे गणित सध्या तरी टाळा. अडलेल्या कामांसाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. खर्च कमी केल्यास आर्थिक तोटा जाणवणार नाही. कुटुंबातील ताणतणाव कमी करा. आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्या.

👌 शुभ दिनांक : 24, 28

Advertisement

◼️ कुंभ : द्विधा स्थिती कमी होईल.

व्यावसायिकदृष्ट्या जबाबदारी वाढती राहील. भागीदारी व्यवसायात अडचणीचा प्रश्न सुटेल. अनावश्यक खर्च टाळल्यास विस्कळीत घडी व्यवस्थित होईल. घरगुती प्रश्न एकजुटीने बसून मिटवा. आध्यात्मिक गोष्टीत मन रमवा.

Advertisement

👌 शुभ दिनांक : 26, 27

◼️ मीन : प्रेरणादायी नेतृत्व

Advertisement

प्रगतीचा आलेख उंचावता राहील. व्यवसायातील तांत्रिक अडचणी कमी होतील. नोकरीमध्ये आगामी गरज लक्षात घ्या. राजकीय क्षेत्रात प्रेरणादायी नेतृत्व राहील. मुलांच्या इच्छा-अपेक्षा पूर्ण कराल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. आध्यात्मिक आवड राहील. शारीरिकदृष्ट्या प्रकृती ठणठणीत राहील.

👌 शुभ दिनांक : 28, 29

Advertisement