Take a fresh look at your lifestyle.

🧐 खुद्द गुगलनेच सांगितलं, “गुगलवर Indian Cricket Team सर्च केलं तर होईल ‘असं’ काही..”

0

🏏 टीम इंडिया कसोटी मालिकेच्या शेवटच्या दिवशी चौथ्या डावात 328 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करत होती.

🤨 एका टप्प्यावर असे वाटत होते की, ऑस्ट्रेलिया सामना ड्रॉ करण्याकडे वाटचाल करून ट्रॉफी कायम ठेवू शकतो, पण तसे झाले नाही. टीम इंडियाने 1888 नंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने गाब्बा येथे ऑस्ट्रेलियाचा पहिला पराभव केला आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2-1 अशा फरकाने जिंकली.

Advertisement

😍 गुगलनं दिलं व्हर्च्युअल सरप्राईज…

▪️ ब्रिस्बेनमधील गाबा मैदानवर भारतीय क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष गुगलही करत आहे.

Advertisement

▪️ गुगलवर तुम्ही Indian Cricket Team किवा India National Cricket Team असं टाइप करुन सर्च करा. तुम्हाला व्हर्चुअल आतिशबाजी दिसेल.

▪️ ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजय प्रत्येक भारतीयानं साजरा केला. कोणी सोशल मीडियावर तर कोणी फटाके वाजवून साजरा केला.

Advertisement

▪️ अनेकांनी फेसबुक आणि ट्विटवर आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. गुगलनेही ट्विट करुन ‘India National Cricket Team’ सर्च करण्यास सांगून व्हर्चुअल आतिषबाजीची माहिती दिली.

▪️ गुगलवर तुम्ही ‘India national cricket team’ सर्च केल्यास तुम्हालाही या आतिषबाजीचा आनंद घेता येईल. मोबाईल किंवा डेस्कटॉपवर सर्च करुन पाहू शकता.

Advertisement

🗣️ गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनीही टीम इंडियाचे अभिनंदन करताना ट्विट केले”, भारताने आजवरची एक महान कसोटी मालिका जिंकली. भारताचे अभिनंदन करतो आणि ऑस्ट्रेलियानेही चांगला खेळ केला आहे.”

Advertisement

Leave a Reply