SpreadIt News | Digital Newspaper

जेव्हा अजिंक्य रहाणे ची पत्नी म्हणते, “घरी येताना चांगले कपडे घालून ये!”

0

अजिंक्य रहाणे याने भारतासाठी केलेली कामगिरी हि मराठी माणसापुरती नाही तर पूर्ण देशवासियांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. अजिंक्य ने भारताला ऑस्ट्रेलियापुढे झुकू दिले नाही. त्यांना त्यांच्याच मातीत लोळवून बॉर्डर-गावस्कर टेस्ट सिरीज जिंकून त्याने ३२ वर्षाचा इतिहास मोडीत काढत नवा भविष्यकाळ लिहिला आहे. भारत ठरवल्यावर काय करू शकतो हे त्याने सिद्ध केले आहे.

अजिंक्य आणि त्याची पत्नी राधिका हे दोघे अगदी शाळेपासून एकेकांसोबत आहेत. अथक प्रयत्नाने त्याने क्रिकेटमध्ये आपले करियर बनवले आणि तिच्याशी लग्न केले. त्यांना एक छोटी मुलगी सुद्धा आहे. अजिंक्य आता ऑस्ट्रेलिया वरून घरी परत येणार होता तेव्हा राधिकाला आनंद तर झालाच होता, त्याच बरोबर त्याचे जंगी स्वागतही तिने आपल्या सोसायटीमधील लोकांबरोबर केले.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🤑 प्रॉफिट झाला तरच ब्रोकरेज द्या! त्यासाठी espresso वर ट्रेडिंग अकाऊंट उघडा

💰 शेअर मार्केटच्या माध्यमातून हजारो रुपये कमवण्यासाठी क्लिक करा 👉
http://bit.ly/2Me4SmM
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Advertisement

आपल्या नवऱ्याने एवढी मोठी कामगिरी केल्यावर कोणतीही पत्नी आनंदी होईल. तिने त्याचे अभिनंदन केले आणि त्याला एक अजब मागणी केली. “तू जेव्हा घरी येशील तेव्हा चांगले कपडे घालून ये!” अशी मागणी तिने त्याला केली. तो गोंधळून गेला. घरी जाताना कशाला चांगले कपडे घालायचे असे त्याला वाटले. ती म्हणाली मुलीला बरं वाटेल. ती दोन महिन्याने तुला भेटणार आहे.

तो त्याच्या घरी आला तेव्हा माटुंग्याच्या त्याच्या घरी त्याचे जंगी स्वागत झाले. सगळे मित्र, आप्तेष्ट, पत्नी आणि मुलीने त्याचे स्वागत केले. त्याला रेड कार्पेट टाकले होते. हे सगळं पाहून तो खूप भावुक झालेला पाहायला मिळाला. “आमच्या कामगिरीमागे पूर्ण देशाचा हात आहे” असे त्याने सांगितले.

Advertisement