SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🏆 आयपीएलच्या 14व्या सत्रात ‘या’ खेळाडूंना त्यांच्या 8 संघाने वगळलं; संजू सॅमसनवर राजस्थानची मदार !

💰 एप्रिल महिन्यात ‘आयपीएल’चा 14वा हंगाम भारतात होण्याची शक्यता असून फेब्रुवारीमध्ये याकरिता खेळाडूंची लिलाव प्रक्रिया होणार आहे.

💁🏻‍♂️ इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 14व्या हंगामात स्टीव्ह स्मिथ, आरोन फिंच, ग्लेन मॅक्सवेल या ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या खेळाडूंची त्यांच्या संघांनी हकालपट्टी केली आहे.

Advertisement

🧐 याशिवाय लसिथ मलिंगा, हरभजन सिंग या अनुभवी खेळाडूंनासुद्धा अनुक्रमे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने वगळले आहे.

🤨 दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबने ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि वेस्ट इंडिजचा शेल्डन कॉट्रेल यांना बाहेरचा रस्ता दाखवला. मॅक्सवेलला गेल्या हंगामात एकही षटकार लगावता आला नाही.

Advertisement

✌️ मुंबईच्या 4 विजेतेपदांत मोलाची भूमिका बजावणाऱ्या मलिंगाने दुखापतीमुळे संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या हंगामातून माघार घेतली होती. परंतु आता मुंबईने त्याला संघात स्थान दिलेले नाही. मलिंगाव्यतिरिक्त जेम्स पॅटिन्सन, नॅथन कुल्टर-नाइल या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनासुद्धा मुंबईने वगळले आहे.

👌 इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 14व्या हंगामात विशेष बाब म्हणजे संजू सॅमसनची राजस्थानच्या कर्णधारपदी निवड केली आहे. तत्पूर्वी काही भारतीय व परदेशी खेळाडूंना त्यांच्या खराब कामगिरीमुळे संघातून काढण्यात आले आहे.

Advertisement

🧢 आठही संघांनी वगळलेले नामांकित खेळाडू-

1️⃣ मुंबई इंडियन्स : लसिथ मलिंगा, नॅथल कुल्टर नाइल, जेम्स पॅटिन्सन, शर्फेन रुदरफोर्ड, मिशेल मॅक्लेनघन, दिग्विजय देशमुख, प्रिन्स बलवंत राय.

Advertisement

2️⃣ चेन्नई सुपर किंग्ज : शेन वॉटसन (निवृत्त), मुरली विजय, केदार जाधव, पीयूष चावला, हरभजन सिंग, मोनू सिंग.

3️⃣ रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : आरोन फिंच, डेल स्टेन, ख्रिस मॉरिस, मोईन अली, पार्थिव पटेल (निवृत्त), शिवम दुबे, उमेश यादव, इसुरू उडाना, पवन नेगी, गुरुकीरात सिंग मान.

Advertisement

4️⃣ दिल्ली कॅपिटल्स : अ‍ॅलेक्स कॅरी, जेसन रॉय, संदीप लामिच्छाने, तुषार देशपांडे.

5️⃣ सनरायजर्स हैदराबाद : बिली स्टॅनलेक, फॅबियन अ‍ॅलन, संजय यादव, बी. संदीप, यारा पृथ्वीराज.

Advertisement

6️⃣ राजस्थान रॉयल्स : स्टीव्ह स्मिथ, टॉम करन, ओशेन थॉमस, अंकित राजपूत, वरुण आरोन, आकाश सिंग, अनिरुद्ध जोशी, शशांक सिंग.

7️⃣ किंग्ज इलेव्हन पंजाब : ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कॉट्रेल, जिमी निशाम, मुजीब उर रहमान, हार्डस विल्जोएन, कृष्णप्पा गौतम, करुण नायर, जगदीश सुचित, तेजिंदर सिंग.

Advertisement

8️⃣ कोलकाता नाइट रायडर्स : निखिल नाईक, सिद्धेश लाड, एम सिद्धार्थ, टॉम बॅन्टन, ख्रिस ग्रीन, हॅरी गर्नी

Advertisement