SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

💉 राज्यात लसीकरणाबाबत अनिश्चितता-राजेश टोपे

😷 कोरोना काळात लस आली खरी मात्र आता लसीकरणाबाबत अनिश्चितता दिसून येत आहे. राजेश टोपे यांनी राज्यात लसीकरण होणार कि नाही यावर प्रश्नचिन्ह असल्याचे सांगितले आहे. ते का असं म्हणाले आपण पाहू:

🧐 लसीकरणानंतर अनेक ठिकाणी रिअॅक्शन आल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र त्या किरकोळ असून त्याला गांभीर्यानं घेण्याची आवश्कता नसल्याचं टोपे यांनी म्हटले आहे.

Advertisement

💻 दरम्यान कोविन अॅपच्या दुरुस्तीसाठी आम्ही लसीकरण थांबवलं होतं. केंद्रानेही आठवड्यातून चारच दिवस लसीकरणाचा कार्यक्रम राबवायला सांगितला होता. त्याचबरोबर ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन लसीकरण व्हावं अशी विनंतही राज्य सरकारनं केंद्राला केली असल्याचं टोपे म्हणाले.

➡️ लसीकरणाबाबत आढावा घेणार असून कोविन अॅपच्या दुरुस्तीसाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशीही चर्चा झाली असल्याचं टोपे यांनी सांगितले आहे. त्यामुळं लसीकरण सुरू होणार की नाही हे मात्र अजूनही अस्पष्टच आहे.

Advertisement