SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

👩‍💻 तासन् तास लॅपटॉपवर काम करून डोळे दुखत असतील तर हा लेख आहे तुमच्यासाठी!

🔐 कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे लोकांना घरून काम करण्याची संधी मिळाली. यातही मजेशीर गोष्ट म्हणजे आता लोकांना ‘वर्क फ्रॉम होम’ इतके आवडू लागले आहे की त्यांना पुन्हा ऑफिसमध्ये जाऊन काम करायचे नाही. यासाठी ते पगारामध्ये तडजोड करण्यासही तयार आहेत. मात्र, दिवसभर संगणक आणि लॅपटॉप समोर बसल्याने डोळ्यांवरचा ताण वाढू लागला आहे.
➖➖➖➖
💝 तुमच्या प्रियजनांना हटके गिफ्ट घ्यायचंय? मग पुढील लिंकवर क्लिक करा 👉http://bit.ly/moneyplant4u
➖➖➖➖
💻 सतत संगणकाच्या पडद्यासमोर काम केल्याने आपले डोळे दिवसभर थकलेले दिसतात. यामुळे काही कालावधीनंतर डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागतात.जास्त वेळ काम केल्याने डोळ्यांमध्ये लालसरपणा, खाज सुटणे आणि डोकेदुखी अशा समस्या उद्भवतात. यावर काही खास उपाय आम्ही तुम्हाला सांगत आहोत, ते जाणून घ्या:

▪️ संगणक आणि लॅपटॉपवर काम करत असताना, आपले डोळे आणि स्क्रीन दरम्यान कमीत कमी 20 इंच अंतर असले पाहिजे.

Advertisement

▪️ मोबाईल आणि लॅपटॉपचा निळा प्रकाश टाळण्यासाठी आपण हलका पिवळा प्रकाश किंवा निळा प्रकाश असणारा फिल्टर अ‍ॅप वापरू शकता.

▪️आपण लॅपटॉपवर बर्‍याच काळासाठी काम करत असताना 20-20-20चे सूत्र वापरू शकता. याचा अर्थ दर तासाला 20 मिनिटे ब्रेक घ्या, 20 इंच अंतर ठेवा आणि 20 मिनिटे नजर दुसरीकडे वळवा.

Advertisement

▪️मॉनिटर किंवा लॅपटॉपच्या समोर बसतांना मॉनिटर तुमच्या डोळ्यांपेक्षा खूप खाली नाही आणि जास्त उंच नाही याची खात्री करुन घ्या.

▪️बराच वेळ काम केल्यावर जर तुमचे डोळे कोरडे होऊ लागले, तर डोळे थंड पाण्याने धुवा.

Advertisement

▪️डोळ्यांखाली काळी वर्तुळे आल्यास 10 मिनिटांसाठी ग्रीन टीची एक थंड पिशवी डोळ्यावर ठेवा.

▪️जास्त दिवस काम केल्यामुळे डोळ्यांभोवती त्रास होत असेल, तर स्क्रीन बंद करा आणि काही काळ विश्रांती घ्या.

Advertisement