Take a fresh look at your lifestyle.

📱 जिओ फोनसाठी असणारे रिलायन्स जिओचे ‘हे’ 4 रिचार्ज प्लॅन झाले बंद !

0

🙅‍♂️ रिलायन्स जिओने आपल्या जिओ फोनसाठी असलेले 4 स्वस्त प्लॅन्स बंद केले आहेत. कंपनीने अलिकडेच अनलिमिटेड कॉलिंगची सेवा सुरू केल्यामुळे हे प्लॅन बंद केल्याचं सांगितलं जात आहे.

🧐 कोणते रिचार्ज प्लॅन बंद ?

Advertisement

▪️ कंपनीने 99 रुपये, 153 रुपये, 297 रुपये आणि 594 रुपयांचे 4 रिचार्ज प्लॅन बंद केले आहेत.

▪️ Jio ने बंद केलेल्या 99 रुपये, 297 रुपये आणि 594 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना 0.5 जीबी डेटा मिळायचा.

Advertisement

▪️ या तिन्ही प्लॅन्सची वैधता अनुक्रमे 28 दिवस, 84 दिवस आणि 168 दिवस होती.

▪️ तिन्ही प्लॅन्समध्ये अनलिमिटेड जिओ टू जिओ व्हॉइस कॉलिंह आणि नॉन-जिओ कॉलिंग मिनिटे मिळायची.

Advertisement

📳 तर 153 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1.5 जीबी डेटा मिळायचा. तसेच अनलिमिटेड जिओ टू जिओ व्हॉइस कॉलिंग आणि नॉन-जिओ कॉलिंग मिनिटांसह 100 एसएमएस प्रतिदिन मिळायचे.

🤔 आता पर्याय काय ?
कंपनीने 99 रुपये, 153 रुपये, 297 रुपये आणि 594 रुपयांचे 4 जिओ फोनचे रिचार्ज प्लॅन बंद केले असले तरी जिओफोन युजर्ससाठी कंपनीकडे 75 रुपये, 125 रुपये, 155 रुपये आणि 185 रुपयांचे प्लॅन उपलब्ध आहेत.

Advertisement

Leave a Reply