SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🚘 तुमची कार चोरीला गेल्यास ती ‘अशी’ ट्रॅक करू शकता, फक्त एवढंच करा..

🔰 चोरी झालेली कार शोधणे आणि ती पुन्हा मिळविणे मोठे कठीण काम असते. अशावेळी जीपीएस डिव्हाईसेस तुम्हाला ती सुरक्षा पुरवू शकतात. समजा कार चोरीला गेलीच तर तुम्हाला ती कुठे आहे याचे लोकेशन पाहता येते आणि चोरापर्यंत पोहोचता येते.

🌐 जीपीएस (GPS): जीपीएस म्हणजेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम. हे एक असे डिव्हाईस असते, जे सतत त्याची पोझिशन (लोकेशन) मालकाला पाठवत असते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🛒 जीपीएस फ्लिपकार्टवर ऑर्डर करण्यासाठी क्लिक करा 👉 https://bit.ly/38RHaFP
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📳 वायर्ड जीपीएस : (Wired GPS)

Advertisement

💤 वायर्ड जीपीएसचा वापर साधारणपणे मोठ्या वाहनांमध्ये केला जातो. हे डिव्हाईस वाहनाची बॅटरी वापरून सॅटेलाईटला सिग्नल पाठविते.

🚗 हे डिव्हाईस वाहनाच्या खालच्या बाजुला लावले जाते. डिव्हाईसने पाठविलेले सिग्नल हे मोबाईलवर पाहता येतात.

Advertisement

♐ कोणत्याही वातावरणात हे डिव्हाईस सिग्नल पाठवतच राहते. जर तुमच्याकडे ट्रक, बस आदी वाहने असतील आणि ती ट्रॅक करावी लागत असतील तर तुम्हाला या प्रकारचे जीपीएस उपयोगी पडतात.

📳 वायरलेस जीपीएस: (Wireless GPS)

Advertisement

🔎 वायरलेस जीपीएस हे त्यातील रिचार्जेबल बॅटरीवर चालते. हे जीपीएस तुम्ही तुमच्या कारमध्ये ठेवू शकता. हे डिव्हाईस वायर्ड जीपीएसपेक्षा कमी क्षमतेचे असते.

🚙 याचा वापर छोट्या वाहनांमध्ये केला जातो. हे डिव्हाईस काही काळाने चार्ज करावे लागते. महत्वाचे म्हणजे हे डिव्हाईस फिक्स करायचे नसल्याने चोरकप्प्यात किंवा चोराला सापडणार नाही अशा जागी ते लपविता येते.

Advertisement

📍 तसेच हे जीपीएस तुम्ही दुसऱ्या वाहनांसाठीदेखील वापरू शकता. या जीपीएसचा आकार छोटा आणि पोर्टेबल असल्याने वापरण्यास सोपे जाते.

Advertisement