SpreadIt News | Digital Newspaper

👌 ‘लग्नाला आला नाहीत तरी आहेर पाहिजे’, वाचा एका लग्नाची अनोखी गोष्ट..

🎊 कोरोनाच्या काळात वेगवेगळ्या पद्धतीचे लग्न आपल्याला पाहायला मिळाले. या काही दिवसांमध्ये कमीत-कमी पाहुण्यांमध्ये लग्न लावण्यात यावी, असे नियम सरकारने लागू केले आहेत.

▶️ त्यामुळे अनेक जण ऑनलाईन पद्धतीने, (व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून) तसंच कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न लावत आहेत. कोरोनामुळे विवाहाचे वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळत आहेत.

Advertisement

💁🏻‍♂️ एका अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा अशीही रंगतेय..

🔰 विशेष असं आहे की, कोरोना काळात चेन्नईतल्या मदुराई येथे एक आगळ्या-वेगळ्या पद्धतीचा विवाहसोहळा धुमधडाक्यात पार पडला. लग्न समारंभात पाहुण्यांना वधूला गिफ्ट देता यावं किंवा पैशांचा आहेर करता यावा यासाठी एक अनोखी शक्कल लढवण्यात आली.

Advertisement

🔰 वधूच्या कुटुंबियांनी तर कमालच केली, त्यांनी चक्क लग्नाच्या लग्नपत्रिकेवर गुगल-पे आणि फोन-पे चा क्युआर कोड (QR Code ) प्रिंट केला होता. आता याचा वापर कशासाठी असा विचार आला तर पाहुण्यांना वधूला आहेर देणं सोपं जाईल, म्हणून ही डिजिटल कल्पना या महारथींनी साध्य केली.

🔰 वधूच्या कुटुंबीयांनी लग्न पत्रिकेवर क्युआर कोड छापत या वेगळ्या पद्धतीचा वापर केला. यामुळे पाहुणे गुगल पे आणि फोन पे च्या माध्यमातून थेट बँकेमध्ये आहेरचे पैसे ट्रान्सफर करु शकतील.

Advertisement

👱‍♀️ वधूची आई टी. जे. जयंती यांनी सांगितले की,

▪️ “जवळपास 30 जणांनी या पर्यायाचा वापर करुन माझ्या मुलीला लग्नामध्ये भेट दिली. तसंच, आमच्या कुटुंबात पहिल्यांदाच या प्रकारचा प्रयोग करण्यात आला आहे.”

Advertisement

▪️ जयंती मदुराई येथे ब्युटी पार्लर चालवतात. हा अनोखा विवाहसोहळा रविवारी पार पडला. या लग्नाची लग्नपत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली, कारण ही कल्पनाही तशी भन्नाटच होती.

▪️त्या म्हणाल्या की, “मला याबाबत खूप जणांचे कॉल आले. अशाच पद्धतीचे कॉल माझा भाऊ आणि कुटुंबातील इतर लोकांचंदेखील सोमवार सकाळपासून येत आहेत.” चेन्नईत पार पडलेल्या या अनोख्या विवाह सोहळ्याची सध्या चर्चा रंगली आहे.

Advertisement

📍 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी लग्नसोहळ्यात अशा प्रकारचा प्रयोग करण्याची ही पहिलीच घटना आहे. या काळामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने नवनवीन कल्पनांचा वापर करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी एका नवीन जोडप्याने आपल्या विवाहसोहळ्याला ऑनलाईन हजेरी लावलेल्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराला त्यांच्या घरी जेवणाची डिलिव्हरी केली होती. या लग्नसोहळ्याची देखील जोरदार चर्चा झाली होती.

Advertisement