SpreadIt News | Digital Newspaper

✌️ 30 वर्षानंतरही हिवरे बाजारची सत्ता पोपटराव पवारांच्या हाती कायम !

0

✊ नगर जिल्ह्यातील ‘आदर्श गाव हिवरेबाजार’ येथे हिवरेबाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवार यांची एकहाती सत्ता आली आहे.

👌 30 वर्षांनी बिनविरोध निवडणुकीची परंपरा प्रथमच खंडित झाली होती. या हिवरेबाजार ग्रामपंचायत निकालाचा सध्या हाती आलेल्या आकडेवारीनूसार पद्मश्री पोपटराव पवार यांच्या पॅनलचा सातही (7) जागांवर विजय झाला आहे.

Advertisement

🗳️ यावेळी निवडणूक बिनविरोध होऊ शकली नसली, तरी निवडणूक कशी असावी, याचाही आदर्श घालून देण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचे पोपटराव पवार यांनी सांगितले होते.

👬🏻 दरम्यान 15 जानेवारी रोजी मतदारांनी उत्स्फूर्त पणे मतदानासाठी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. गावातील किशोर संबळे यांनी पुढाकार घेऊन पोपटराव पवार यांच्याविरोधात पॅनल उभा केल्याने येथील निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. त्यामुळे यावेळी मतदान
झाले.

Advertisement

❗ हिवरेबाजारमध्ये 30 वर्षांची परंपरा खंडीत-

हिवरेबाजारमध्ये 1989 पासून निवडणूक बिनविरोध होत आली आहे. हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवार यांचा शब्द अंतिम मानला जात होता. त्यामुळे 7 सदस्यीय ग्रामपंचायत 1989 पासून बिनविरोध राहिली. पण यंदा ही परंपरा खंडीत झाली असून सातही जागांवर पोपटराव पवार यांच्या आदर्श ग्रामविकास पॅनलला विजय मिळाला.

Advertisement