Take a fresh look at your lifestyle.

💁🏻‍♂️ पदवी व पदव्युत्तर प्रवेश घेताय ? मग प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी मिळाली मुदतवाढ

0

📑 पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या उमेदवारांसाठी EWS मुळ प्रमाणपत्र, NCL मुळ प्रमाणपत्र, मूळ जात पडताळणी प्रमाणपत्र (CVC) सादर करण्यासाठी दिनांक 20 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

🗣️ उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले..

Advertisement

▪️ पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व उमेदवारांनी दिनांक 20 जानेवारी 2021 पर्यंत स्वत:च्या लॉग इनमधुन ऑनलाईन पध्दतीने मुळ प्रमाणपत्र सादर करावी.

▪️ जे उमेदवार मुळ प्रमाणपत्र दिनांक 20 जानेवारी 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करणार नाहीत, अशा उमेदवारांचा प्रथम फेरीतील प्रवेश रद्द करुन त्यांना दुसऱ्या फेरीकरीता खुल्या वर्गातून पात्र ठरविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

Advertisement

▪️ ज्या उमेदवारांनी वरील तीन प्रमाणपत्राकरीता अर्ज केल्याची पावती ऑनलाईन अर्ज करताना सादर केलेली आहे, अशाच उमेदवारांना ही मुदतवाढ देण्यात येत आहे.

▪️ तसेच पुढील सुधारीत वेळापत्रक सोमवार दिनांक 18 जानेवारी 2021 नंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या http://www.mahacet.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे श्री. सामंत यांनी सांगितले.

Advertisement

⌛ “विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता हा निर्णय घेतला असून याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. ही मुदतवाढ अंतिम असून या नंतर कोणत्याही स्वरूपाची मुदत वाढवून देण्यात येणार नाही याची नोंद विद्यार्थी व पालकांनी घ्यावी”, असेही सामंत म्हणाले.

Advertisement

Leave a Reply