SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

💁🏻‍♂️ 9 वर्षाचा यूट्यूबर कमावतो तब्बल ‘इतके’ कोटी, जाणून घ्या 2020 मधील ‘ते’ टॉप-5 यूट्यूबर..

🎮 रेयान काजीने या वर्षी जगाला यूट्यूबवरून करत असलेल्या कमाईने आश्चर्यचकीत केले आहे. अवघ्या 9 वर्षाच्या वयात रेयान खेळण्याचा रिव्ह्यूअर आहे. जो आपल्या यूट्यूब चॅनेलवर मुलाच्या खेळण्याचा रिव्ह्यू करतो आणि लहान मुलांच्या खेळणीबद्दल आपली मतं मांडतो.

🧐 जाणून घेऊ रेयानच्या कमाईबद्दल..

Advertisement

📌 रेयानच्या व्हिडिओजला लाखो व्ह्यूज मिळतात. यूट्यूबवरून रेयान काजी लागोपाठ तिसऱ्या वर्षी सर्वात जास्त कमाई करणारा यूट्यूबर बनला आहे.

📌 रेयानने या वर्षी 30 मिलियन डॉलर म्हणजेच 220 कोटी रुपये कमावले आहेत. हा आकडा आपल्या सर्वांना थक्क करणारा आहे.

Advertisement

📌 रेयानने गेल्या वर्षी 191 कोटी रुपये आणि 2018 मध्ये 125 कोटी रुपयांची कमाई करून रेयान पहिल्या नंबरवर होता.

👁️ रेयानच्या चॅनलबद्दल सविस्तर..

Advertisement

👾 रेयानच्या चॅनेलचे नाव Ryan’s World आहे. रेयान आपल्या यूट्यूब चॅनेल ‘रेयान्स वर्ल्ड’वर खेळणीसंबंधी माहिती देत असतो. त्याचे व्हिडिओ शेयर करत असतो. त्याच्या चॅनेलचे 2.7 कोटी सब्सक्रायबर्स आहेत.

👾 रेयान काजी आपल्या चॅनेलवर छोट्या मुलांच्या खेळणीचे अनबॉक्सिंग करून त्याचा व्हिडिओ बनवत असतो. रेयान या खेळणी सोबत एक व्हिडिओ सुद्धा बनवत असतो. जेणेकरून ती खेळणी कशी आहे व खेळणी कशी खेळली जाते, यावर माहिती देत असतो.

Advertisement

👾 रेयानचे अनेक व्हिडिओ एक अब्जहून जास्त वेळा पाहिले गेले आहे. तर त्याच्या चॅनेलचे एकूण व्ह्यूज 35 अब्ज आहेत. या चॅनलवर रेयानचे 1800 पेक्षा जास्त व्हिडीओज आहेत.

👾 रेयान काजी आपल्या चॅनेलवर मुलांच्या खेळण्याच्या वस्तूंचे अनबॉक्सिंग करतो. त्याचे व्हिडिओ बनवतो. सोशल मीडियावर त्याच्या व्हिडिओला खूप पसंत केले जाते. अवघ्या 9 वर्षात कोट्यवधी रुपयांची कमाई करून रेयानने भल्याभल्यांना तोंडात बोटे घालायला लावली आहेत.

Advertisement

👑 जगातील सर्वात जास्त कमाई करणारे टॉप 5 यूट्यूबर-

▪️ रेयान काजी – 29.5 मिलियन डॉलर
▪️ मिस्टर बीस्ट – 24 मिलियन डॉलर
▪️ ड्यूड परफेक्ट – 23 मिलियन डॉलर
▪️ रेट अँड लिंक – 20 मिलियम डॉलर
▪️ मार्कीप्लायर – 19.5 मिलियन डॉलर

Advertisement

📍 रेयानच्या या धमाल कामगिरीमुळे त्याला ‘छोटा पॅकेट, बडा धमाका’ असं म्हणणं वावगं ठरणार नाही. रेयानच्या या खास यशामागे, कामामागे त्याचे आई वडिलही त्याला सपोर्ट करत आहेत. आई वडिलांच्या संकल्पनेनुसारच त्याने हे सर्व काम केलं. मात्र, यात रेयानच्या नैसर्गिक अभिनयाचा वाटा मोठा आहे. त्याच्या या सहज वावरामुळेच त्याचे व्हिडीओ सर्वाधिक पसंतीस उतरले आहेत.

Advertisement