SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🌐 ..आता इंग्रजी सर्च केले तरी गुगल देणार मराठीत रिझल्ट !

💁🏻‍♂️ इंटरनेटवर प्रादेशिक भाषांचा अधिक वापर बघता गुगलने त्यांस प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार आता नेटकऱ्यांना गुगलवर इंग्रजीतून सर्च केल्यावर मराठी भाषेमध्ये मजकूर मिळणार आहे.

🔎 लोकप्रिय सर्च इंजिन गुगलचा सर्च रिझल्ट केवळ इंग्रजी आणि हिंदी या दोनच भाषांमध्ये येत होता. गुगल इंडिया कंपनीने आज प्रादेशिक भाषांसंदर्भात मोठी घोषणा करत पुढच्या महिन्यापासून ही सेवा सुरू होत असल्याचे सांगितले.

Advertisement

✍🏻 गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं की..

▪️ गुगलने मल्टीलँग्वेज मॉडेलची घोषणा करताना निवडण्यात आलेल्या भाषांना बहुभाषिक प्रतिनिधित्व असे म्हटले आहे.

Advertisement

▪️ हिंदुस्थानात भाषांचे मोठे आव्हान आहे. तिथे 100 किलोमीटरवर भाषा बदलते. त्यामुळे कंपनी एकाच भाषेला सपोर्ट करत नाही, असे गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

▪️ भारतीय युजर्सना आता गुगल मॅप्समध्येदेखील गुगल मॅप्सच्या सेटिंगमध्ये जाऊन आपली प्रादेशिक भाषा निवडावी लागणार आहे. गुगल असिस्टंटमध्येही स्थानिक भाषेचा पर्याय असणार आहे.

Advertisement

📞 तसेच, गुगल आता ‘ट्रू कॉलर’ला रिप्लेस करण्याच्या तयारीत आहे. ‘Phone by Google’ चे नवीन व्हर्जन गूगल लाँच करण्याची तयारी केली आहे. या नवीन अ‍ॅपचे नाव ‘Google Call’ असे असणार आहे. या आगामी मोबाईल अ‍ॅपमध्ये युजर्सला कॉलर-आयडी आणि स्पॅम कॉल थांबविण्याची सुविधा मिळेल. तसेच, कंपनी या अ‍ॅपद्वारे ट्रू कॉलर अ‍ॅपला टक्कर देण्याची शक्यता आहे.

Advertisement