Take a fresh look at your lifestyle.

🏦 पोस्ट ऑफिस आणि पेमेंट बँकची सर्व्हिस आता एकाच अ‍ॅपवर, डाक-पे अ‍ॅप्लिकेशन झालं लाँच

0

📬 इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि टपाल विभाग यांनी मंगळवारी नवीन डिजिटल पेमेंट अ‍ॅप ‘डाक-पे’ (DakPay) लाँच केलं. आता तुम्ही या नवीन डिजिटल पेमेंट अ‍ॅपद्वारे बँकिंग आणि टपालच्या अन्य सेवाही एकाच अ‍ॅपवर वापरु शकणार आहात.

💁🏻‍♂️ Dakpay चा ‘असा’ करा वापर –

Advertisement

🧩 डाऊनलोड केल्यानंतर नाव, मोबाईल नंबर आणि पिन कोड टाकून अ‍ॅपमध्ये प्रोफाईल बनवावी लागेल. तुम्ही एकापेक्षा जास्त बँक अकाऊंट लिंक करु शकतात.

🧩 यानंतर युपीआय किंवा अन्य प्रकारे मनी ट्रान्सफर करता येईल. या अ‍ॅपमध्येही युपीआय अ‍ॅपप्रमाणे 4 अंकी पिन नंबर क्रिएट करावा लागेल.

Advertisement

🧩 ‘DakPay’ या अ‍ॅपमध्ये डिजिटल पेमेंटसाठी क्यूआर कोड स्कॅन करण्याचा पर्याय आहे. ‘डाकपे’च्या माध्यमातून ग्राहक डॉमेस्टिक मनी ट्रान्सफर अर्थात डीएमटीद्वारे पैसे पाठवू शकतात.

🧩 गुगल प्ले-स्टोअरवरुन हे अ‍ॅप फ्रीमध्ये डाऊनलोड करता येईल. डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा 👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.fss.ippbpsp

Advertisement

🧩 व्हर्च्युअल डेबिट कार्ड आणि यूपीआयच्या माध्यमातून कोणत्याही सेवा किंवा मर्चंटला पैसे पाठवू शकता. बायोमेट्रिकद्वारे कॅशलेस इकोसिस्टम तयार करण्यात अ‍ॅप मदत करेल.

📍 DakPay अ‍ॅप एका व्हर्चुअल इव्हेंटमध्ये लाँच करण्यात आले. कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना परस्पर व्यवहार करण्यायोग्य बँकिंग सेवा मिळतील. यावेळी दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद देखील उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply