Take a fresh look at your lifestyle.

👺 ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जादूटोणा प्रयोग

0

❌ समाजामध्ये अनिष्ठ रूढी, प्रथा, परंपरा यांना फाटा देत, आधुनिक युगाकडे आपली वाटचाल चालू आहे.

🚫 असे असतानाच काही विचित्र मानसिकता असणारे लोक अघोरी विद्या वापरून जादूटोणा सारख्या अनिष्ठ रूढीला खतपाणी घालत असतात.

Advertisement

💁‍♂️ सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत या घटना सहज घडतात. मात्र, जेव्हा राज्यातील मंत्री पदावर असणाऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत असा प्रकार घडतो, तेव्हा या रूढी किती खोलवर मूळ रुजवून समाजात आहेत याची जाणीव प्रत्येकालाच होते.

😰 विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून, अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याचे हेतूने शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा. अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होवून दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर करण्यात आला.

Advertisement

👀 पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटो समोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू , पांढरा कोंबडा यांचा वापर करून अघोरी जादूटोणा करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली आहे.

🧐 या प्रसंगातून पुन्हा एकदा या रूढी आणि परंपरा कशाप्रकारे वाईट मार्गाला लागू शकतात याचे उदाहरण समोर आले आहे.

Advertisement

Leave a Reply