Take a fresh look at your lifestyle.

👌 भारताचा कोरोना रिकव्हरी रेट जगात भारी – आरोग्य मंत्रालय

0

😷 भारताचा कोरोना रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) हा जगातील इतर सर्व देशांपेक्षा अधिक आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

🗣️ आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की,

Advertisement

▪️अमेरिका, ब्राझील, रशिया आणि इटली या कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांतील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे भारतापेक्षा कमी आहे.

▪️ सरकारने कोरोनाचा संसर्ग थोपवण्यासाठी आखलेली स्पष्ट रणनीती, सक्रियता, कडक निकषामुळे भारतात सातत्याने कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढत आहे तर वेगाने कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट आणि मृत्यूदर कमी होत आहे.

Advertisement

▪️ जगाचा एकत्रित रिकव्हरी रेट हा 70.27 टक्के इतका आहे. यामध्ये भारताचा रिकव्हरी रेट हा 95.31 टक्के आहे. तर अमेरिका, ब्राझील, रशिया आणि इटली या देशांचा रिकव्हरी रेट भारतापेक्षा कमी आहे, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.

💁🏻‍♂️ दैनंदिन आकडेवारीनुसार, भारतात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे जास्त आहे. तर बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या जवळपास 95 लाख आहे. त्याचबरोबर बरे होणारे रुग्ण आणि ॲक्टिव्ह रुग्ण यामध्येही सातत्याने वाढ होत आहे. आजवरची ही संख्या 91,67,374 इतकी आहे.

Advertisement

Leave a Reply