SpreadIt News | Digital Newspaper

🏏 कोहली आणि रोहित शिवाय सामना जिंकून देणारे फलंदाज भारताकडे; सचिन तेंडुलकरने व्यक्त केला विश्वास

💁‍♂️ वनडे मालिका गमावल्यानंतर टी-20 मालिकेत भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्याला चांगली सुरुवात केली आहे.

➡️ मात्र, भारतापुढे मोठे आव्हान आहे ते म्हणजे कसोटी मालिकेचे.

Advertisement

👉 कसोटी मालिकाही ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. यात महत्त्वाची बाब अशी की, रोहित शर्मा दुसऱ्या कसोटी सामन्यात पर्यंत खेळू शकणार नाहीये.

🧐 विराट कोहली हा कर्णधार आहे आणि तो देखील पहिला कसोटी सामना खेळूनच भारतात परतणार आहे.

Advertisement

😰 त्याचबरोबर पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी देखील पहिल्याच सामन्यांमध्ये भारताची निराशा केली आहे.

👀 क्रिकेटप्रेमींच्या मनामध्ये आता भारताची धुरा कोण सांभाळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Advertisement

▪️ क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने कोहली आणि रोहित शिवाय देखील असे खेळाडू आहेत जे भारताला जिंकून देतील असा विश्वास दाखवला आहे.

ℹ️ सचिन तेंडुलकर याविषयी अधिक बोलताना म्हणाला की, रोहित शिवाय एखादा दौरा खेळण्याची आपली पहिलीच वेळ नाहीये. क्रिकेटमध्ये काहीच शाश्वत नसतं. कधीकधी खेळाडूंना दुखापतीमुळे पूर्ण मालिकेला मुकावं लागतं. एखाद्या खेळाडू शिवाय मैदानात उतरण्याची तयारी करावीच लागते.

Advertisement