Take a fresh look at your lifestyle.

🛣️ भारत टोलनाक्यांपासून मुक्त होणार, टोलवर थांबण्याची गरज नसणार !

0

🚧 देशातील वाहनांचा मुक्त संचार सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 2 वर्षांत भारत टोल व अडथळ्यांपासून मुक्त होणार आहे.

💁🏻‍♂️ मंत्री नितीन गडकरी यांनी दिली माहिती-

Advertisement

▪️ टोलसाठी जीपीएस (GPS) प्रणालीचे काम चालू आहे, येत्या दोन वर्षांत तुम्ही प्रवास केलेल्या अंतरावरुन टोल आपोआपच तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून वजा करण्यात येईल.

▪️ सरकार यासाठी जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम) प्रणाली आणणार आहे. रशियन सरकारच्या मदतीने लवकरच जीपीएस (GPS) सिस्टमचे काम पूर्ण होईल व 2 वर्षांत भारत पूर्णपणे टोलमुक्त होईल.

Advertisement

▪️ देशातील सर्व व्यावसायिक वाहने ट्रॅकिंग सिस्टमने सुसज्ज आहेत. त्याचबरोबर सर्व जुन्या वाहनांमध्ये जीपीएस सिस्टम तंत्रज्ञान बसविण्यासाठी सरकार वेगाने काम करेल.

▪️ गेल्या वर्षभरात केंद्र सरकारने वाहनांच्या मुक्त संचाराकरीता टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य केला आहे. फास्टॅग अनिवार्य केल्यानंतर इंधन बचत होत असून प्रदूषणही कमी झालं असल्याचं त्यांनी सांगितलं.

Advertisement

🗣️ गडकरी म्हणाले, “काल रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि अध्यक्ष, एनएचएआय यांच्या उपस्थितीत टोल वसुलीसाठी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करून एक सादरीकरण दिले. येत्या पाच वर्षांत आमच्या टोलचे उत्पन्न 1,34,000 कोटी होईल, अशी अपेक्षा असल्याचं गडकरी म्हणाले.

Advertisement

Leave a Reply