SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

❗ व्हॉट्सअ‍ॅपची मोठी घोषणा: पेंशनसह व्हॉट्सअ‍ॅपवरून आता इन्शुरन्सही खरेदी करता येणार

💬 भारतातील लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपनं मागील महिन्यात देशभरात पेमेंट सेवा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता त्यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे.

💁🏻‍♂️ Facebook Fuel for India 2020 या कार्यक्रमात त्यांनी या वर्षाच्या अखेरपर्यंत ‘अफोर्डेबल सॅशे साइज्ड’ आरोग्य विमा सेवा पुरवणार असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

🗣️ व्हॉट्सअ‍ॅप इंडियाचे प्रमुख अभिजीत बोस म्हणाले की,

▪️ या वर्षाच्या अखेरपर्यंत एसबीआयचे किफायतशीर विमा पॉलिसी व्हॉट्सअ‍ॅपवरुन घेणं शक्य होईल. याशिवाय एचडीएफसी पेन्शन प्लॅनही व्हॉट्सअ‍ॅपवरुन घेता येऊ शकतील.

Advertisement

▪️ आपल्या ग्राहकांना ही सेवा देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने SBI General Insurance Co. Ltd. सोबत एक करार देखील केलाय. याशिवाय HDFC च्या माध्यमातून कंपनी पेंशन संदर्भातील पॉलिसीही देऊ शकते.

▪️ ज्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर असेल, असा दावाही त्यांनी केला.

Advertisement

📍 व्हॉट्सअ‍ॅप भारतीय स्टेट बँक (एसबीआय), एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अ‍ॅक्सिस बँकेशी करार करुन आपल्या ग्राहकांना पेमेंटची सुविधा पुरवत आहे.

Advertisement