SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

😷 कोरोना चाचणी दर झाले आता आणखी स्वस्त!

🧪 कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये सहाव्यांदा कपात करण्यात आली आहे. आता 700 रुपयात चाचणी होणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टापे यांनी केली आहे. विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री बोलत होते.

🗣️ आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले..

Advertisement

▪️ राज्यात कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही दिलासादायक बाब आहे. मात्र, अजूनही नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.

▪️ कोरोनाची चाचणी आता आणखी स्वस्त झाली आहे. कोरोना चाचणीत 280 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

Advertisement

▪️ कोरोनाच्या चाचणीसाठी आता 700 रुपये मोजावे लागणार आहे. या नव्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

📍 तसेच, राज्याचा रुग्णवाढीचा दर हा 0.21 इतका असून केंद्र शासनाच्या पोर्टलवर रुग्णवाढीचा दर जास्त असलेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नसल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Advertisement