SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

📈 सेन्सेक्स ने गाठला ऐतिहासिक उच्चांक!

▪️ मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सोमवारी नवीन ऐतिहासिक उच्चांक गाठला. दिवसअखेर १५४ अंकांच्या वाढीसह सेन्सेक्स ४६,२५० अंकांच्या पुढे बंद झाला.

▪️ राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा ४४ अंकांच्या वाढीसह विक्रमी १३,५५८ अंकांवर बंद झाला. आयसीआयसीआय बँक, एल अँड टी आणि कोटक बँकच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

Advertisement

▪️ परकीय गुंतवणूकीचा ओघ बाजारात कायम आहे तसेच जागतिक शेअर बाजारातही चांगली स्थिती आहे. त्याचा सकारात्मक परिणाम मुंबई शेअर बाजारावर दिसून आला.

▪️ आजच्या व्यवहाराच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराने ४६,३७३ ही ऐतिहासिक उंची गाठली होती. पण त्यानंतर काही अंकांची घट होऊन बाजार ४६,२५३ अंकांवर बंद झाला.

Advertisement

▪️ निफ्टी १३,५५८ अंकांवर बंद झाला असला तरी, निफ्टीने सुद्धा १३,५९७ हा सार्वकालीन उच्चांक गाठला होता. आज च्या शेअर्सला चांगलाचा फायदा झाला.

▪️ त्यानंतर एल अँड टी, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, एचसीएल टेक, टायटन आणि कोटक बँकच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

Advertisement