SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

💁🏻‍♂️ फायद्याचं! ‘ही’ 5 सरकारी अ‍ॅप्स डाऊनलोड केली, तर अनेक कामं होतील सोपी!

📱 सध्याचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. अशा परिस्थितीत काही महत्त्वपूर्ण सरकारी अ‍ॅप्स देखील आपल्या मोबाईलमध्ये असलीच पाहिजेत, ज्याच्या मदतीने आपण बरेच सरकारी कामं करू शकतो.

🧐 ‘त्या’ 5 अ‍ॅप्सपासून आपल्याला फायदा काय?

Advertisement

1️⃣ MyGov App –

या डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून सामान्य लोक धोरणे तयार करण्यात आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात आणि सरकारला सल्ला आणि सूचना देऊ शकतात. या प्लॅटफॉर्मवर सरकारी योजनांची माहिती मिळू शकते आणि ते मंत्रालय आणि विविध विभागांशी संवाद साधू शकतात. या अ‍ॅपचे देशभरात 10 लाखापेक्षा जास्त वापरकर्ते आहेत.

Advertisement

2️⃣ mParivahan –

रस्ते वाहतूक तसेच वाहतुकीचे नियम आणि त्यांच्या उल्लंघनांवरील दंड यासंबंधित माहितीसाठी सरकारने मोबाइल अ‍ॅप म्हणून एम.परिवहन सुरू केले. या अ‍ॅपवर आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स तयार करणे, वाहन मालकाचे नाव, वाहन नोंदणी तारीख, नोंदणी प्राधिकरण, वाहन वर्ग, विमा वैधता, फिटनेस वैधता यासह बरीच माहिती मिळू शकेल. या अ‍ॅपचे 30 लाखाहून अधिक वापरकर्ते आहेत.

Advertisement

3️⃣ mPassport Seva –

पासपोर्ट सेवा अधिक सुलभ करण्यासाठी सरकारने एमपासपोर्ट नावाचे मोबाइल अ‍ॅप सुरू केले आहे. ज्याद्वारे सामान्य लोकांना पासपोर्ट अर्ज, पासपोर्ट सेवा केंद्र तसेच पासपोर्ट बनविणे आणि सद्यस्थितीशी संबंधित सर्व माहिती मिळू शकते. भारतातील 50 लाखांहून अधिक लोक एमपासपोर्ट सेवा अ‍ॅपचा वापर करत आहेत.

Advertisement

4️⃣ UMANG –

उमंग (युनिफाइड मोबाईल अ‍ॅप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नन्स) हे अ‍ॅप डिजिटलायझेशनच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टाकलेले पाऊल आहे. या अ‍ॅपद्वारे लोकांना आरोग्य सेवा, वित्त, शिक्षण, गृहनिर्माण, ऊर्जा, शेती, वाहतूक तसेच रोजगार आणि कौशल्य याविषयी माहिती मिळते. उमंग अ‍ॅपवर तुम्हाला आधार, डिजीलॉकर आणि पे गव्हर्नमेंट (PayGov) संबंधित माहिती देखील मिळू शकेल.

Advertisement

5️⃣ Aarogya Setu –

कोरोना महामारीच्या काळात आरोग्य सेतू अ‍ॅपद्वारे आपल्याला आसपासच्या कोरोना बाधित तसेच आजारी लोकांची माहिती मिळते. तसेच कोरोना केअर सेंटर, कोरोनाबाबत देश आणि जगभरातील माहिती ऑडिओ-व्हिडिओ आणि बातम्यांच्या रूपात मिळते. मॉल किंवा गर्दीच्या ठिकाणी प्रवेश करताना आरोग्य अ‍ॅप आहे की नाही याबाबत विचारणा केली जाते.

Advertisement