SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

💰 सॅमसंगचा चीनला झटका; भारतात करणार तब्बल ‘इतक्या’ कोटींची गुंतवणुक

📱 चीनमधून सॅमसंग आपला हा व्यवसाय गुंडाळणार असून तो भारतात सुरू केला जाणार आहे. सॅमसंगनं उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आपलं डिस्प्ले युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

👥 उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत नोएडामध्ये सॅमसंगला ओएलईडी डिस्प्ले युनिट उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

Advertisement

💁🏻‍♂️ सॅमसंगचा ‘असा’ असेल इन्व्हेस्टमेंट प्लॅन – 

▪️ सॅमसंग भारतात 4 हजार 825 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर 1 हजार 510 प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.

Advertisement

▪️ भारत सरकारनं सुरू केलेल्या स्कीम फॉर प्रमोशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक कंपोनंट्स अँड सेमीकंडक्टर्स अंतर्गत सॅमसंगला 460 कोटी रूपयांची आर्थिक मदत मिळेल.

▪️ या प्रकल्पासाठी उत्तर प्रदेश सरकार इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग धोरणाअंतर्गत अनुदान आणि स्टँप ड्युटीमध्ये कंपनीला सूट देणार आहे.

Advertisement

▪️ तर मोठ्या प्रमाणात अप्रत्यक्ष रोजगारही सुरू होणार असल्याचं म्हटलं जात आहे. जगभरात टीव्ही, मोबाईल, टॅब, घड्याळं यांच्यात वापरले जाणारे 70 टक्के डिस्प्ले हे सॅमसंग तयार करते.

⏳ पुढील 5 वर्षांमध्ये कंपनीनं 50 अब्ज डॉलर्सची निर्यात करण्याचं ध्येय ठेवलं आहे. सॅमसंग डिस्प्ले युनिटला केस टू केस मदत करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन मंत्र्यांच्या समितीची स्थापना केली होती. कंपनीला विशेष मदतीसाठी या समितीनं काही सूचनाही केल्या होत्या

Advertisement