SpreadIt News | Digital Newspaper

💉 डिसेंबरमध्येच मिळेल परवानगी, जानेवारीपासून कोरोना लसीकरण- अदर पूनावाला

0

😷 कोरोनाची लस कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. भारतात तीन औषध कंपन्यांनी आपल्या कोरोना लशीला आपत्कालीन मंजुरी मिळावी यासाठी अर्ज केले आहेत.

📝 पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया सीरमनं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्राझेनका कंपनीसह मिळून लस तयार केली आहे. लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी द्यावी यासाठी ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडे अर्ज केला आहे.

Advertisement

🗣️ सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला म्हणाले..

▪️ सुरुवातीला देशाच्या किमान 20 ते 30 टक्के लोकसंख्येला लस देण्याच्या दृष्टीने केंद्रीय आरोग्य मंत्रालय नियोजन करत आहे. सरकारला जुलै 2021पर्यंत लशीचे 30 ते 40 कोटी डोस हवे असल्याचंही पूनावाला यांनी म्हटलं आहे.

Advertisement

▪️ नियंत्रक यंत्रणेची परवानगी मिळाली, तर भारताचा कोरोना लसीकरण कार्यक्रम जानेवारी 2021मध्ये सुरू होऊ शकतो, असं अदर पूनावाला यांनी सांगितलं.

▪️ आम्हाला इमर्जन्सी लायसन्स चालू महिन्याच्या अखेरपर्यंत मिळेल, पण लसीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यासाठीची परवानगी नंतर मिळेल.

Advertisement

▪️ सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 पर्यंत प्रत्येक नागरिकाला पुरण्याएवढ्या लशी उपलब्ध होतील आणि आपलं नेहमीचं जीवन सुरळीतपणे सुरू होईल, अशी आशाही पूनावाला यांनी व्यक्त केली.

📍 कोविड-19 लशीच्या निर्मितीसाठी नोव्हावॅक्स कंपनीसोबत करार केल्याचंही त्यांनी सांगितलं. 2021च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत नोव्हाव्हॅक्सच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या पूर्ण होण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.

Advertisement