SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

📳 PM-WANI: देशात येणार Wi Fi क्रांती, जाणून घ्या काय आहे पीएम-वाणी..

📶 भारतात वाय-फाय क्रांती आणण्यासाठी केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत PM-WANI ही योजना देशभर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

💁🏻‍♂️ PM-WANI बद्दल थोडंसं.. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सरकारच्या या निर्णयाबद्दल सांगितले की, “PM-WANI म्हणजे पंतप्रधान वाय-फाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेस. कॅबिनेटने देशभर ही योजना लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशात व्यापक स्वरुपात वाय-फाय नेटवर्क उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.”

Advertisement

📜 कशी असेल योजना?

📌 पब्लिक डेटा ऑफिस म्हणजे पीडीओ. या अंतर्गत देशभर पब्लिक डेटा ऑफिस सुरु करण्यात येतील. यासाठी रजिस्ट्रेशन किंवा लायसन्स फी आवश्यक नसेल.

Advertisement

📌 हा पब्लिक डेटा ॲग्रीगेटर असेल. याद्वारे पब्लिक डेटा ऑफिसचे अकाउंटिंग आणि कार्यप्रणाली वर देखरेख ठेवली जाणार आहे.

📌 या योजनेसाठी एक खास ॲप तयार करण्यात येणार आहे आणि युजर्सना ते डाऊनलोड करावं लागेल. त्याचे एक डिजिटल ऑथेंटिकेशन असेल.

Advertisement

👌 PM-WANI चे फायदे काय?

▪️ पंतप्रधान वाय-फाय अंतर्गत पब्लिक डेटा ॲग्रीगेटर आणि ॲप प्रोव्हायडरना सात दिवसांच्या आत रजिस्ट्रेशन करावं लागेल. PM-WANI ही देशातील खूप मोठी क्रांती असेल.

Advertisement

▪️ देशातील प्रत्येक भागात इंटरनेटची उपलब्धता होण्यास मदत होणार आहे. खेडेगावातील विद्यार्थी आपली पुस्तके डाऊनलोड करु शकतात.

▪️ सरकार याला ॲप स्टोअर सोबत आपल्या वेबसाईटवरही दाखवणार आहे. याच्या जाहिराती आणि लिंक सार्वजनिक करण्यात येतील. त्यानंतर नागरिक देशातील कोणत्याही पब्लिक डेटा ऑफिसमधून वाय-फाय ॲक्सेस करु शकतील.

Advertisement

📍 या योजनेमुळे कौशल्य विकासाचं काम सुलभ होण्यास मदत होईल, व्यापार आणि उद्योगधंद्यांचे काम सुलभ होण्यास मदत होईल. अशा प्रकारचे अनेक फायदे या योजनेमुळे होतील. ही योजना डिजिटल बदलाचं मोठं माध्यम ठरण्याची शक्यता आहे.”

Advertisement