SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

💉 कोरोनाची लस घेण्यासाठी अशी करा को-वीन ऍप वर नोंद!

💁‍♀️ कोरोनाची लस लवकरात लवकर यावी अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे. मात्र हि लस मिळवण्यासाठी काय करावे लागणार? भारतासारख्या देशात प्रत्येकाला लस मिळावी यासाठी काय प्रणाली असेल असे अनेक प्रश्न सामान्य माणसाच्या मनात आहेत.

👉 लसीकरणाची प्रक्रिया सुरळीतपणे आणि कोणत्याही त्रासाविना पार पडावी, म्हणून केंद्र सरकार नियोजन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून को-विन हे मोबाइल अ‍ॅप सरकारकडून विकसित केलं जात आहे.

Advertisement

ℹ️ त्याद्वारे नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करता येणार असून, सरकारी यंत्रणेलाही लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेणं सोपं होणार आहे.

👍 हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर, अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरसह जिओ फोन्सवरही उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Advertisement

📊 अ‍ॅडमिनिस्ट्रेटर मोड्युल, रजिस्ट्रेशन मोड्युल, व्हॅक्सिनेशन मोड्युल, बेनिफिशियरी अ‍ॅक्नॉलेजमेंट मोड्युल आणि रिपोर्ट मोड्युल अशी पाच मोड्युल्स या अॅपमध्ये असतील.

📌 सामान्य नागरिकांना रजिस्ट्रेशन मोड्युलद्वारे लसीसाठी नोंदणी करता येईल. को-मॉर्बिडिटीबद्दलची सर्वेक्षणातून मिळालेली, तसंच स्थानिक यंत्रणेकडची माहिती ‘को-विन’ अ‍ॅपमध्ये अपलोड केली जाणार असल्याचंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.

Advertisement

📍 लसीकरण यंत्रणा राबवणाऱ्यांना ती योग्य पद्धतीने राबवण्यासाठी आणि समन्वयासाठी अॅडमिनिस्ट्रेटर मोड्युलचा उपयोग होईल. लस घेणाऱ्या व्यक्तीची माहिती आणि त्याने लस घेतली आहे की नाही, याची माहिती व्हॅक्सिनेशन मोड्युलमध्ये नोंदवली जाईल.

✅ नागरिकाने लस घेतल्यानंतर क्यू-आर कोडवर आधारित सर्टिफिकेट्स तयार करण्याचं, तसंच संबंधित नागरिकाला एसएमएस पाठवण्याचं काम बेनिफिशियरी अॅक्नॉलेजमेंट मोड्युलद्वारे केलं जाईल.

Advertisement

▪️ लसीकरणाची किती सत्रं पार पडली, एकूण किती जणांचं लसीकरण पूर्ण झालं आदी माहितीचे अहवाल तयार करण्याचं काम रिपोर्ट मोड्युलद्वारे केलं जाईल.

Advertisement