SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🏏 बीसीसीआय कडून इंग्लंडच्या भारत दौऱ्याची घोषणा; पुण्यात रंगणार वन डे सामने!

💁‍♀️ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियासाठी पुढचं आव्हान तयार आहे. टीम इंडियाला घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी, टी-२० आणि वन-डे अशी प्रदीर्घ मालिका खेळायची आहे.

📍 बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आज या दौऱ्याची घोषणा केली. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता बीसीसीआय प्रत्येक खेळाडूच्या तब्येतीची काळजी घेईल असं आश्वासन बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिलं आहे.

Advertisement

👍 आरोग्यविषयक सर्व नियमांची पूर्तता करुन दोन्ही संघांना सुरक्षित वाटेल यासाठी बायो सिक्युर बबल तयार करण्यात येणार आहे.

ℹ️ दरम्यान इंग्लंडचा संघ या मालिकेत 4 कसोटी, 5 टी-20 आणि 3 वन-डे सामने खेळणार आहेत. यातील दोन सामने चेन्नईत, उर्वरित दोन सामने आणि टी-20 मालिका अहमदाबाद तर वन-डे मालिका पुण्यात रंगणार आहे.

Advertisement

➡️ असे असेल पुण्यातील वन डे मालिकांचे वेळापत्रक:

▪️ 23 मार्च – पहिला वन डे सामना
▪️ 26 मार्च – दुसरा वन डे सामना
▪️ 28 मार्च – तिसरा वन डे सामना

Advertisement