SpreadIt News | Digital Newspaper

🚘 तर अडचणी वाढणार; वाहनांवरील नंबर प्लेट बाबत ‘आरटीओ’ची महत्त्वपूर्ण घोषणा

0

🔐 1 डिसेंबरपासून वाहनांवर हाय सिक्योरिटी नंबर प्लेट नसल्यास आरटीओमध्ये गाडीसंबंधी जवळपास सर्वच कामं रखडण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वाहनांमध्ये हाय सिक्योरिटी नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. शासनाने 1 एप्रिल 2019 आधी खरेदी केलेल्या वाहनांमध्ये हाय सिक्योरिटी नंबर प्लेट लावण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ दिला होता.

💁‍♂ हाय सिक्योरिटी नंबर प्लेट विषयी:-

Advertisement

👉 HSRP एक होलोग्राम स्टिकर असतो, ज्यावर वाहनाचं इंजिन आणि Chassis नंबर असतो. हाय सिक्योरिटी नंबर प्लेट वाहनाची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेता तयार करण्यात आली आहे. हा नंबर प्रेशर मशिनने लिहिला जातो. प्लेटवर एक प्रकारची पीन असते, जी वाहनाशी जोडली जाते. ही पीन एकदा वाहन आणि प्लेटशी जोडली गेल्यास, दोन्ही बाजूने लॉक होते.

😮 अशा वाढतील अडचणी :-

Advertisement

👉 हाय सिक्योरिटी नंबर प्लेटशिवाय व्यावसायिक वाहनांना प्रवास करणं कठीण होईल. ट्रक, बस, छोट्या वाहनांसाठी परमिट, मासिक टॅक्स जमा होणार नाही. नवीन नंबर प्लेटशिवाय जे निर्बंध लागू होतील, त्याचा थेट परिणाम व्यावसायिक वाहनांवर होईल.

👨‍💻 असा करा ऑनलाईन अर्ज :-

Advertisement

👉 bookmyhsrp.com/index.aspx वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर सार्वजनिक किंवा खाजगी वाहन यापैकी एक पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर काही माहिती भरावी लागेल. गाडीला रजिस्ट्रेशन प्लेट असेल आणि केवळ स्टिकर लावायचा असल्यास, www.bookmyhsrp.com या वेबसाईटवर जाऊन माहिती भरावी लागेल.

Advertisement