SpreadIt News | Digital Newspaper

⛽ पेट्रोल नाबाद 90: राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले!

0

🛢️ देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतच चालल्या आहेत. कोरोना काळात पेट्रोल- डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. वाढत जाणाऱ्या पेट्रोल- डिझेलच्या किंमतीमुळे आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

💁🏻‍♂️ पेट्रोल-डिझेलची भाववाढ-

Advertisement

▪️ 25 नोव्हेंबरला 77 रुपये 9 पैसे प्रति लिटर दर असणारे डिझेल आज राज्यातील 7 जिल्ह्यामध्ये 80 रुपयांच्या वर गेले आहेत. डिझेलच्या दरात 18 ते 20 पैशांची वाढ झाली.

▪️राज्यातील तब्बल 19 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या किंमतींनी 90 रुपयांचा टप्पा ओलांडला असून, पेट्रोलचे दर काल 15 ते 17 पैशांने वाढले होते. त्यात आज पुन्हा वाढ झाली आहे.

Advertisement

▪️ महाराष्ट्रभरातील तब्बल 19 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या किंमतींनी 90 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

▪️ मुंबई शहरामध्ये डिझेलची किंमत 24 पैशांनी वाढून 79.66 रुपयांवर आले आहे, तर पेट्रोलच्या किंमतीही 19 पैशांनी वाढल्या आहेत.

Advertisement

📍 नागपूर, परभणी, नांदेड, सोलापूर, अमरावती, औरंगाबाद आणि बुलढाणा या जिल्ह्यात डिझेलच्या किंमत एका लिटरला 80 रुपयांच्या वर गेली आहे. परभणीत पेट्रोल दर सर्वाधिक 91.95 रुपये आहे.

Advertisement