Take a fresh look at your lifestyle.

👾 जिओची गेमिंग क्षेत्रात उडी; ‘या’ कंपनीत केली तब्बल ‘एवढी’ गुंतवणूक

0

🎮 देशभरात गेमिंग इंडस्ट्रीत पुढील दोन वर्षांमध्ये अजून तेजी येण्याची शक्यता आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ या टेलिकॉम कंपनीने सॅन फ्रान्सिस्कोमधील मोबाईल गेमिंग कंपनी ‘क्रिकी’मध्ये गुंतवणूक केली आहे.

💰 जिओची तब्बल ‘इतकी’ गुंतवणूक-

Advertisement

🧩 जिओकडून या गुंतवणूकीसोबतच क्रिकीमध्ये आतापर्यंत एकूण 22 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक झाली आहे.

🧩 जिओने केलेल्या गुंतवणूकीनंतर क्रिकीने रिलायन्स जिओसोबत “यात्रा” नावाचा एक नवीन ‘ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी’ मोबाइल गेम लाँच केला आहे.

Advertisement

🧩 रिलायन्स जिओच्या ग्राहकांना हा नवीन गेम 3D अवतारात खेळण्याची विशेष सुविधा मिळेल.

🧩 हा गेम गुगल प्ले स्टोअर आणि आयओएस स्टोअरवरुन फ्रीमध्ये डाऊनलोड करता येईल.

Advertisement

🤝 “कल्पना आणि वास्तव यांची सांगड घालणं आमचं व्हिजन आहे. ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीच्या माध्यमातून आम्ही काल्पनिक जगाला तुमच्या फोनद्वारे थेट तुमच्या घरापर्यंत पोहोचवू”, असं क्रिकीचे संस्थापक जाह्नवी आणि केतकी श्रीराम यांनी म्हटलं आहे.

🗣️ जिओचे डायरेक्टर अंबानी म्हणाले.. ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी गेमिंगमध्ये युजर्सना एका नव्या जगाचा अनुभव मिळतो. जिओ आणि अन्य युजर्सनी ‘यात्रा’ गेमच्या माध्यमातून ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीचा अनुभव घ्यावा”, असं आवाहन जिओचे डायरेक्टर आकाश अंबानी यांनी केलं आहे

Advertisement

Leave a Reply