SpreadIt News | Digital Newspaper

🧢 टीम इंडियाला मोठा धक्का, रविंद्र जडेजा टी-20 मालिकेतून बाहेर

0

🏏 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी-20 मालिकेची सुरुवात विजयाने केलेल्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. पहिल्या सामन्यात नाबाद 44 धावांची खेळी करुन टीम इंडियाला 161 धावांचा महत्वपूर्ण टप्पा ओलांडून देण्यास मदत करणारा रविंद्र जाडेजा टी-20 मालिकेतून बाहेर गेला आहे.

🤨 कारण काय?

Advertisement

▪️ पहिल्या टी-20 सामन्यात फलंदाजीदरम्यान अखेरचं षटक खेळत असताना स्टार्कचा चेंडू जाडेजाच्या हेल्मेटला लागला.

▪️ मग टीम इंडियाने काँकशन सबस्टीट्युशन अंतर्गत दुसऱ्या डावात युजवेंद्र चहलला मैदानावर उतरवलं. चहलनेही 3 बळी घेत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा मिळवला.

Advertisement

▪️ आज जडेजाला झालेल्या दुखापतीचं स्कॅनिंग होणार असून त्यानंतर त्याच्यावर काय उपचार करायचे याची दिशा ठरवली जाईल.

▪️ त्यामुळे निवड समितीने खबरदारीचा उपाय म्हणून शार्दुल ठाकूरला उर्वरित टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघात जागा दिली आहे.

Advertisement

👤 भारतीय संघाचे फिजीओ नितीन पटेल आणि डॉक्टर रविंद्र जडेजाच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. निवड समितीने खबरदारीचा उपाय म्हणून मराठमोळ्या शार्दुल ठाकूरला उर्वरित टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघात जागा दिली आहे. 1-0 ने आघाडीवर असलेल्या भारतीय संघाचा दुसरा सामना रविवारी खेळवला जाणार आहे.

Advertisement