SpreadIt News | Digital Newspaper

😳 अक्षय कुमारने ‘या’ गोष्टीसाठी योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागितली परवानगी; वाचा नेमकं काय आहे कारण..

0

🤝 मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री अक्षय कुमार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीमध्ये अभिनेता अक्षय कुमारने योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी सुरू करण्याच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला.

👥 बैठकीत काय?

Advertisement

▪️ अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या येणाऱ्या ‘रामसेतु’ या चित्रपटाची उत्तर प्रदेशमधील अयोध्यात शुटिंग करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे परवानगी मागितली आहे.

▪️ अक्षय कुमार आता योगी आदित्यनाथ यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर अयोध्यामध्ये त्याच्या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात करणार आहे, अशी माहिती आहे.

Advertisement

▪️ या बैठकीत योगी आदित्यनाथ यांनी अक्षय कुमार साकारत असलेल्या सामाजिक चित्रपटाचे योगी आदित्यनाथ यांनी कौतुक देखील केले. शिवाय अक्षय कुमारने योगी आदित्यनाथ सरकारने उत्तर प्रदेशात चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी घेतलेल्या पुढाकारासाठी त्यांचे आभार मानले.

🎥 ‘राम सेतू’च्या चित्रीकरणाविषयी..

Advertisement

📌 अक्षय कुमारला त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण उत्तर प्रदेशात करायचे आहे. याकरता परवानगी मागण्यासाठी आणि सहकार्य करण्याची विनंती करण्यासाठी अक्षय कुमारने योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्याचे व दोघांमध्ये ‘राम सेतू’ चित्रपटाविषयी चर्चा झाल्याचे कळते आहे.

📌 ‘रामसेतु’ चित्रपटाचा पोस्टर अक्षयने दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित केला. अक्षयने पोस्ट केलेला पोस्टर अत्यंत
आकर्षक आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेश सरकार अक्षयला त्याच्या आगामी चित्रपटासाठी परवानगी देणार की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Advertisement

🗣️ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, “अक्षय कुमारने आपल्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटातून समाज प्रबोधन केले. तसेच, अक्षयचे चित्रपट नेहमीच समाजाला प्रेरणा देणारे ठरत असल्याचे”, म्हणत योगी आदित्यनाथ यांनी अक्षय कुमारचे कौतुक केले आहे.

Advertisement