SpreadIt News | Digital Newspaper

😷 राज्यात कोरोनाचे 127 बळी; पुणे ‘या’ बाबतीतही आघाडीवर

0

💁🏻‍♂️ राज्यात गेल्या आठ महिन्यांपासून दररोजचा नवीन कोरोनाबाधितांचा आकडा 25 हजारांवर गेला होता. मृतांचा आकडा कमी झाला असला तरी अजूनही दररोज सरासरी शंभरच्या वर कोरोना बाधित रुग्ण दगावत असल्याने चिंता मात्र कायम आहे.

🧐 राज्यातील कोरोनाचा आढावा –

Advertisement

▪️ गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाने 127 रुग्ण दगावले असून, आतापर्यंत या आजाराने 47 हजार 599 रुग्णांचा बळी घेतला आहे.

▪️ सर्वाधिक 10 हजार 945 रुग्ण एकट्या मुंबईत दगावले आहेत. सध्या राज्यातील कोरोना मृत्यूदर 2.58 टक्के एवढा आहे.

Advertisement

▪️ दिवसभरात 5 हजार 229 नवीन रुग्णांची भर पडली आहे. 6 हजार 776 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 92.81 टक्के इतके झाले आहे.

▪️ आतापर्यंत एकूण 17 लाख 10 हजार 50 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 92.81 टक्के इतके झाले आहे.

Advertisement

👤 पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण – राज्यात कोरोनाचे सध्या 83 हजार 859 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. या रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. सध्या सर्वाधिक 19 हजार 553 ॲक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत.

📍 आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 11 लाख 32 हजार 231 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18 लाख 42 हजार 587 (16.55 टक्के ) नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 47 हजार 504 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 5 हजार 567 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Advertisement