SpreadIt News | Digital Newspaper

😋 रेसिपी: घरीच तयार करा बाजरीचे वडे ‘या’ सोप्या पद्धतीने!

0

🥶 हिवाळा सुरु झाला की हवेतील गारठा वाढू लागतो. म्हणून या दिवसांमध्ये शरीराला उष्णता देणारे पदार्थ खाण्यावर भर दिला जातो.

🧐 हिवाळ्यात बाजरीच्या भाकऱ्याच बहुतांश खाल्ल्या जातात. मात्र, भाकरी व्यतिरिक्त बाजरीपासून इतरही पदार्थ तयार करता येतात. त्यामुळे बाजरीचे वडे कसे करायचे ते जाणून घेऊयात..

Advertisement

🍱 साहित्य-

▪️ बाजरीचे पीठ – दोन वाटय़ा
▪️ भिजवलेली उडीद डाळ – अर्धी वाटी
▪️ जिरे -दोन लहान चमचे
▪️ हिरव्या मिरच्या – 5 ते 6
▪️ लसूण पाकळ्या – 7 ते 8 पाकळ्या
▪️ चिरलेली कोथिंबीर – अर्धी वाटी
▪️ हिंग व हळद – 2 चमचे
▪️ ओवा,मीठ, तेल – गरजेनुसार

Advertisement

🥯 कृती-

1️⃣ सर्वप्रथम उडीद डाळ वाटून घ्या.

Advertisement

2️⃣ जिरे, लसूण, हिरव्या मिरच्या वाटून घ्या.

3️⃣ बाजरीच्या पिठात हे सर्व घाला. हिंग, हळद, ओवा, कढीपत्ता घाला. गरम तेलाचे मोहन चार टी स्पून घाला.

Advertisement

4️⃣ पीठ मळून घ्या. नंतर या मिश्रणाचे पुरीच्या आकाराचे वडे थापून तेलात तळून घ्या. वरून तीळ लावल्यास छान दिसतील.

5️⃣ हे वडे दही किंवा कुठल्याही चटणी बरोबर सव्‍‌र्ह करा.

Advertisement