SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

💻 ‘नोकिया’ लवकरच भारतात लाँच करणार लॅपटॉप!

👨‍💻 फिनलँडची स्मार्टफोन निर्माता कंपनी नोकिया लवकरच भारतात आपला लॅपटॉप लाँच करण्याच्या तयारीत आहे. एचएमडी ग्लोबलने स्मार्टफोन, फीचर फोन आणि मोबाइल अ‍ॅक्सेसरीजसाठी नोकिया कंपनीला परवाना दिला आहे.

💁🏻‍♂️ मिळालेल्या माहितीनुसार..

Advertisement

▪️ 27 नोव्हेंबर रोजी नोकिया लॅपटॉप ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अर्थात BIS च्या वेबसाईटवर पाहण्यात आला आहे. कंपनी लवकरच आपला लॅपटॉप बाजारात आणण्याची शक्यता आहे.

▪️ बीआयएस लिस्टिंगनुसार, नोकियाचे लॅपटॉप चीनमध्ये टोंगफँग लिमिटेड निर्मित केले गेले आहेत. कंपनी ब्रँडअंतर्गत 9 लॅपटॉप भारतात लाँच करू शकते.

Advertisement

▪️ नोकियाचे सर्व लॅपटॉप Windows 10 ऑपरेटिंग सिस्टमसह, Intel Core i3 आणि Core i5 प्रोसेसरसह लाँच केले जाणार आहेत.

▪️ नोकिया लॅपटॉपच्या किंमतीबाबत आणि स्टोरेज कॅपेसिटीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Advertisement

🛒 नोकियाच्या इतर प्रोडक्ट्स स्मार्ट टीव्ही, स्ट्रीमिंग बॉक्सप्रमाणे हे लॅपटॉपही ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध केले जाण्याची शक्यता आहे. तरी कंपनीकडून लॅपटॉपबाबत अद्याप कोणतीही माहिती अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.

Advertisement