SpreadIt News | Digital Newspaper

👌 कौतुकास्पद! सोलापूरच्या शिक्षकाला 7 कोटींचा ‘ग्लोबल टिचर पुरस्कार’; बनले पहिलेच भारतीय

0

🤝 युनेस्को आणि लंडनस्थित ‘वार्की फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल टीचर पुरस्कारा’साठी सोलापूरमधील परितेवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांची निवड झाली.

✌️ तब्बल 7 कोटी रुपयांचा (एक दशलक्ष अमेरिकी डॉलर) हा पुरस्कार असून ते मिळवणारे डिसले हे पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.

Advertisement

👨🏻‍🏫 140 देशांच्या शर्यतीत आघाडीवर-

▪️ जगभरातील 140 देशांतील 12 हजारांपेक्षा अधिक शिक्षकांनी या पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर केले होते.

Advertisement

▪️ प्राथमिक फेरीसाठी पन्नास, तर अंतिम फेरीसाठी डिसले यांच्यासह इटली, ब्राझिल, व्हिएतनाम, मलेशिया, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, अमेरिका, ब्रिटनमधील 10 शिक्षकांना नामांकने जाहीर झाली होती.

▪️ लंडनमधील ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’मध्ये कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीव्हन फ्राय यांनी या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली.

Advertisement

🧐 ‘या’ कारणामुळे निवड-

✔️ ’डिसले यांनी शालेय अभ्यासक्रमांच्या पुस्तकांना ‘क्यूआर कोड’ची जोड देऊन शिक्षणात ‘डिजिटल क्रांती’ करण्याचा प्रयोग केला.

Advertisement

✔️ ’या प्रयोगाने केवळ महाराष्ट्राच्याच नाही, तर देशाच्या शिक्षण क्षेत्रात क्रांती झाली. तब्बल 83 देशांतील विद्यार्थ्यांना ते ऑनलाईन माध्यमाद्वारे विज्ञान शिकवतात.

✔️ ’त्याचबरोबर अस्थिर राष्ट्रांतील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करतात. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी, बालविवाहाला आळा बसविण्यासाठी डिसले यांनी प्रयत्न केले.

Advertisement

👥 पुरस्काराची निम्मी रक्कम यांना देणार – डिसले यांनी पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम या पुरस्कारासाठी अंतिम फेरीत पोहोचलेल्या अन्य 9 शिक्षकांना व टीचर इनोव्हेशन फंड’साठी देण्याचे जाहीर केले. यामुळे या 9 देशांतील हजारो शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी मदत होईल, असा आशावाद डिसले यांनी व्यक्त केला.

Advertisement