SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🏏 पांड्यानं मला चुकीचं ठरवलं; मांजरेकरांचा यु टर्न

🤩 तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत तिसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 13 धावांनी पराभव करत शेवट गोड केला. यावेळी तिसऱ्या सामन्यात केलेल्या आक्रमक खेळीमुळे पांड्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

🇮🇳 तिसऱ्या सामन्यात हार्दिक पांड्यानं 92 धावांची नाबाद खेळी करत संघाला 300 धावांचा टप्पा पार करुन दिला. सामन्यानंतर समालोचक संजय मांजरेकर यांनी यु टर्न घेत हार्दिक पांड्याचं कौतुक केलं.

Advertisement

🤨 याआधी केली होती पांड्यावर टीका :-

🗣️ हार्दिक पांड्या संघात स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून खेळू शकत नाही, त्यामुळे मी पांड्याऐवजी मनिष पांड्येला संधी देईल, असं मांजरेकर म्हणाले होते.

Advertisement

🏆 पांड्याची खेळी अशी ठरली निर्णायक :- 

🤟 टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा अपयशाचा पाढा वाचला पण हार्दिक पांड्या व जडेजा यांनी 150 धावांची नाबाद भागीदारी केली. टीमला 302 धावा करवून दिल्या. हार्दिकनं मालिकेतील सलग दुसरे आणि कारकिर्दीतील 6वे अर्धशतक पूर्ण केले.

Advertisement