SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🏏 टीम इंडियाला विजय मिळवण्यात यश; हार्दिक पांड्या-रवींद्र जडेजा यांनी लाज वाचवली

👥 हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा यांनी १५० धावांची नाबाद भागीदारी करत भारतीय संघाची इज्जत राखली आहे. आज तिसऱ्या वन डे सामन्यात भारत विजयी झाला असला तरी याच श्रेय या दोघांना जातं.

🤟 टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. पण, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी दमदार खेळी केली.

Advertisement

🤩 पांड्या आणि जडेजाने अशी जमवली भट्टी

🔥 हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा यांनी १५० धावांची नाबाद भागीदारी करताना संघाला ३०२ धावांचा डोंगर उभा करून दिला.हार्दिकनं मालिकेतील सलग दुसरे आणि कारकिर्दीतील ६वे अर्धशतक पूर्ण केले. जडेजानेही १३वे अर्धशतक पूर्ण केले.

Advertisement

🏆 आणि तिथे मिळाली सामन्याला कलाटणी

👉 पांड्या आणि जडेजाने मजबूत खेळी केली होती. मात्र ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी दमदार खेळ करताना टीम इंडियाचे टेंशन वाढवले. दरम्यान जसप्रीत बुमराहनं मोक्याच्या क्षणी मॅक्सवेलचा त्रिफळा उडवला आणि सामन्याला कलाटणी दिली.

Advertisement