SpreadIt News | Digital Newspaper

🎓 ‘या’ 7 जिल्ह्यातील तलाठी भरतीचा मार्ग मोकळा

0

✔️ मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टात अडकल्यामुळे रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया राज्य सरकारने नुकतीच सुरु केली. उर्वरित सात जिल्ह्यातील सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना या निर्णयाबाबत कळविण्यात आले आहे.

🗣️ महसुलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले..

Advertisement

▪️ 26 जिल्ह्यातील तलाठी पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यानंतर आता 7 जिल्ह्यांमध्ये रखडलेल्या तलाठी पदाच्या भरतीचा मार्गही शासनाने मोकळा केला आहे.

▪️ मराठा आरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे.

Advertisement

▪️ बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्ह्यामध्ये या तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या देणार असल्याचं, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

📍 26 जिल्ह्यातील तलाठी पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती. अहमदनगरमध्ये या भरती प्रक्रियेत 10 उमेदवार डमी असल्याचा संशय व्यक्त झाला होता. त्यामुळे 7 जिल्ह्यातील भरतीला स्थगिती देण्यात आली होती. आता ही उर्वरित प्रक्रिया देखील सुरु होणार आहे.

Advertisement